चिपळूण-राष्ट्रीय समाजपक्षाला रामराम करणारे अशोक पवार शिंदे गटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-राष्ट्रीय समाजपक्षाला रामराम करणारे अशोक पवार शिंदे गटात
चिपळूण-राष्ट्रीय समाजपक्षाला रामराम करणारे अशोक पवार शिंदे गटात

चिपळूण-राष्ट्रीय समाजपक्षाला रामराम करणारे अशोक पवार शिंदे गटात

sakal_logo
By

-rat18p38.jpg- KOP22L51019 मुंबई : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करताना रासपचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार.
------------
रासपचे माजी जिल्हाध्यक्ष
अशोक पवार शिंदे गटात
चिपळूण, ता. १८ ः राष्ट्रीय समाज पक्षाला राम राम ठोकलेल्या जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले. अशोक पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्ष जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी मेहनत घेतली होती. तालुकास्तर तसेच ग्रामीण भागात त्यांनी कार्यकर्तेही निर्माण केले होते. मात्र पक्षाचे प्रामाणिकपणे कामकाज करूनही त्याची दखल घेतली नाही. शिवाय सातत्याने पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. यापुढे त्यांनी सहकाऱ्यांसोबत शिंदे गटात सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला आहे. चिपळुणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यात आपले सहकारी जाहीर प्रवेश करणार असल्याचे अशोक पवार यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97423 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..