साडवली-ग्राहक पंचायतीतर्फे एसटी बस चालकांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-ग्राहक पंचायतीतर्फे एसटी बस चालकांचा सन्मान
साडवली-ग्राहक पंचायतीतर्फे एसटी बस चालकांचा सन्मान

साडवली-ग्राहक पंचायतीतर्फे एसटी बस चालकांचा सन्मान

sakal_logo
By

rat18p33.jpg- KOP22L51003

देवरूख ः एसटी चालकांसह अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी व सदस्य.
ग्राहक पंचायतीतर्फे एसटी बस चालकांचा सन्मान
साडवली, ता. १८ : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने चालक दिनी देवरूख आगारातील चालकाना त्यांच्या सेवेबद्दल पेढे देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यापुढेही प्रवाशांना सुरक्षित सेवा मिळावी यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी बसस्थानक परिसरातील व्यापारी, तसेच चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी यांच्यासह प्रवाशांना ग्राहक पंचायतीच्या माहिती पत्रकांचे वाटप केले. कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय सहसचिव नेहा जोशी, प्रांत कोषाध्यक्षा ॲड. वेदा प्रभुदेसाई, संगमेश्वर तालुका पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रवीण जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले, अभिषेक अग्रवाल, प्रा. धनंजय दळवी उपस्थित होते. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत देशभर सुरू असलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सदस्य नोंदणी मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन सदस्य होण्याचे आवाहन ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97491 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..