निराधारांनी साजरा केला पंतप्रधानांचा वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निराधारांनी साजरा केला पंतप्रधानांचा वाढदिवस
निराधारांनी साजरा केला पंतप्रधानांचा वाढदिवस

निराधारांनी साजरा केला पंतप्रधानांचा वाढदिवस

sakal_logo
By

51104
अणाव ः ‘आनंदाश्रय’ येथे भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


निराधारांनी साजरा केला पंतप्रधानांचा वाढदिवस

‘आनंदाश्रया’त उत्साह ः अणाव येथे ‘सेवा पंधरवड्याचा’ प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः कुडाळ भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस अणाव येथील आनंदाश्रय येथे साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ व ओरोस मंडलाच्यावतीने ‘सेवा पंधरवड्याचा’ प्रारंभ करण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने संपूर्ण राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम आदी विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त कुडाळ व ओरोस मंडलाच्यावतीने ‘सेवा पंधरवडाचा’ प्रारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते आनंदाश्रय येथे करण्यात आला. या प्रसंगी निराधार वृद्धांना धान्यवाटप तसेच पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यासमवेत केक कापण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल तसेच तालुका सरचिटणीस विजय कांबळी, देवेंद्र सामंत उपस्थित होते. यावेळी सर्व निराधार वृद्धांनी पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. त्यावेळी ''आनंदाश्रय''चे बबन परब तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, पप्या तवटे, एनटी आघाडी अध्यक्ष दीपक खरात, नगरसेवक नीलेश परब, माजी सभापती नूतन आईर, ओरोस मंडल महिला मोर्चा अध्यक्षा सुप्रिया वालावलकर, स्नेहा सावंत, तुळसुली सरपंच नागेश आईर, युवा मोर्चाचे सोशल मीडिया अध्यक्ष राजवीर पाटील, सरचिटणीस अमित तावडे, सरचिटणीस अवधूत सामंत, निखिल कांदळगावकर, प्रितेश गुरव, महिला मोर्चाच्या पिंगुळी अध्यक्ष साधना माडये, कुडाळ महिला मोर्चा उपाध्यक्ष मुक्ती परब, अणाव शक्तिकेंद्र प्रमुख प्रशांत परब, योगेश घाडी, जयेश चिंचलकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97558 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..