मणचेत वस्तीला गेलेल्या बसचा चालक बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मणचेत वस्तीला गेलेल्या
बसचा चालक बेपत्ता
मणचेत वस्तीला गेलेल्या बसचा चालक बेपत्ता

मणचेत वस्तीला गेलेल्या बसचा चालक बेपत्ता

sakal_logo
By

मणचेत वस्तीला गेलेल्या
बसमधील चालक बेपत्ता
देवगड, ता. १८ : विजयदुर्ग आगारातील मणचे येथे वस्तीची फेरी घेऊन गेलेला चालक बेपत्ता झाल्याची तक्रार विजयदुर्ग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. मणचे येथे काल वस्तीला पोहचल्यावर रात्री अकरानंतर चालक गायब झाल्याचे तक्रारीत नमुद आहे. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयदुर्ग आगारातून दुपारी अडीचला बसफेरी सोडण्यात आली. देवगड येथे बस आल्यानंतर ही बस मणचे येथे वस्तीसाठी गेली. सायंकाळी सातला मणचे येथे बस पोहचल्यावर चालक व वाहक बसमध्येच वास्तव्य करतात. या दरम्यान रात्री अकराच्या सुमारास चालक बसमध्ये नसल्याचे वाहकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने विजयदुर्ग आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. चालकाकडील मोबाईलही बंद होता. रविवारी सकाळी सातला ही बस पुन्हा देवगड ते विजयदुर्ग अशी प्रवासफेरी करणार होती. यावेळी चालक बस नेण्यासाठी तेथे येईल, असे वाटले होते; परंतु त्यावेळेतही तो हजर झाला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेऊन घटनेची खबर विजयदुर्ग पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक भारतकुमार फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयदुर्ग पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97563 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..