पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिसाळलेल्या कुत्र्याच्या
हल्ल्यात तरुण गंभीर
पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर

sakal_logo
By

51105
सावंतवाडी ः जखमी प्रकाश होळकर.
51106
सावंतवाडी ः शहर परिसरात भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या.

पिसाळलेल्या कुत्र्याच्या
हल्ल्यात तरुण गंभीर
ओटवणेतील घटना; घरात घुसून हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः पिसाळलेल्या कुत्र्याने थेट घरात घुसून हल्ला केल्यामुळे ओटवणे येथील तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता. १७) घडली. प्रकाश होळकर (४०), असे त्यांचे नाव आहे. कुत्र्याने चावा घेतल्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. नातेवाईकांनी सतर्कता दाखवत कुत्र्याला पळवून लावले. त्यानंतर जखमी होळकर यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सध्या भटक्या कुत्र्यांचे प्रमाण सर्वत्रच वाढले आहे. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना, दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या व्यक्तींना तसेच ज्येष्ठ नागरिकांना या भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या अचानक हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सांगली नगरपालिकेला फोन करून कुत्र्यांच्या नसबंदीबाबत माहिती दिली होती. तसेच त्यांनी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याशी याबाबत चर्चा करून माहिती घेतली. त्यानंतर मसुरकर यांनी सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांशी फोन करून या विषयावर चर्चा केली असता. मुख्याधिकारी जावडेकर यांनी भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसंदर्भात सहमती दर्शविली आहे. ‘सामाजिक बांधिलकी’च्या माध्यमातून मुख्याधिकारी जावडेकरांकडे भटक्या कुत्र्यांची नसबंदी व मोकाट फिरणाऱ्या गुरांचा बंदोबस्त करण्याची विनंती करणार असल्याचे मसुरकरांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97564 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..