रत्नागिरीःसमितीला ‘राजभाषा कीर्ती’ पुरस्‍कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीःसमितीला ‘राजभाषा कीर्ती’  पुरस्‍कार
रत्नागिरीःसमितीला ‘राजभाषा कीर्ती’ पुरस्‍कार

रत्नागिरीःसमितीला ‘राजभाषा कीर्ती’ पुरस्‍कार

sakal_logo
By

rat19p3.jpg-
51086
रत्नागिरी ः नगर राजभाषा कार्यान्‍वयन समिती, रत्‍नागिरीचे अध्‍यक्ष संतोष सावंतदेसाई यांनी सर्वोच्च पुरस्‍कार गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्रीय रेल्वे राज्‍य मंत्री दर्शना जरदोश यांचे हस्‍ते स्‍वीकारला.
-------
रत्‍नागिरी नगर राजभाषा कार्यान्‍वयन
समितीला ‘राजभाषा कीर्ती’ पुरस्‍कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ः हिंदीच्‍या प्रचार-प्रसार कार्य करणारे संस्‍थाना दिला जाणारा सर्वोच्‍च पुरस्‍कार राजभाषा कीर्ती प्रथम पुरस्‍कार भारत सरकारच्या राजभाषा विभागद्वारे हिंदी प्रचार-प्रसाराच्या हेतू गठित झालेल्या रत्‍नागिरी नगर राजभाषा कार्यान्‍वयन समितीला 2021-22 या वर्षीसाठी प्रदान करण्‍यात आला.
या पुरस्‍काराचे वितरण १४ सप्‍टेंबरला अखिल भारतीय राजभाषा संमेलन सुरत (गुजरात) येथे हिंदी द‍िवस कार्यक्रमात करण्‍यात आले. नगर राजभाषा कार्यान्‍वयन समि‍तिने विविध क्षेत्रात केंद्र सरकारचे हिंदीचे प्रसाराचे काम केले व त्‍याबरोबर शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. समितीचे स्‍वतंत्र कार्यालय त्‍याचबरोबर हिंदी, मराठी पुस्‍तकांची लायब्ररी बँक ऑफ इंडिया, विभागीय कार्यालयाने सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्‍ध करून दिली आहे. समितीच्‍या नियोजनाचे कार्य बँक ऑफ इंडियाच्‍या विभागीय कार्यालयाला सोपवलेले आहे. सध्‍याचे समिती अध्‍यक्ष संतोष सावंतदेसाई यांनी हा सर्वोच्च पुरस्‍कार गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्रीय रेल्वे राज्‍यमंत्री दर्शना जरदोश यांचे हस्‍ते स्‍वीकारला. या वेळी गृहराज्‍यमंत्री अजय कुमार मिश्रा आणि गृह राज्‍यमंत्री निशि‍थ प्रामाणि‍क आदी उपस्थित होते. हा पुरस्‍कार रत्‍नागिरी शहरातील केंद्र सरकारी कार्यालय, विमा कंपनी तथा बँकांचे कार्यालयांनी केलेल्‍या हिंदीच्‍या कार्याचा गौरव असल्‍याचे समितीचे अध्‍यक्ष श्री. सावंतदेसाई यांनी सांगितले. तसेच मराठी भाषेला संपर्क भाषा हिंदीची जोड देऊन ग्राहक आधार वाढवून व्‍यवसाय वृद्धी करावी व कोणतीही योजनेची माहिती जनतेला दिली जाईल ती ग्राहकांच्‍या भाषेत दिली जाईल याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97569 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..