वायंगणी किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायंगणी किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम
वायंगणी किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम

वायंगणी किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम

sakal_logo
By

rat19p4.jpg-
51087
वायंगणी :येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान करणारे सागरी सीमा मंच, अनुलोम, जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते.
------------
वायंगणी किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम
पावस, ता. १९ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सागरी सीमा मंच, जिल्हा प्रशासनातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छ सागर तट अभियान वायंगणी येथील किनाऱ्यावर राबविण्यात आले. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
सागरी सीमा मंच व शासनाने आयोजित केलेल्या अभियानात अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळाने पुढाकार घेतला होता. गावातील महिला बचत गट, ग्रामपंचायत सदस्य, धार्मिक संस्था, आशा सेविका, पंचायत समिती आरोग्य विभाग, पोलीस विभाग, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका गोळप आणि वायंगणी गावातील ग्रामस्थ या अभियानात सहभागी झाले.
सागरी सीमा मंचाचे रवींद्र भोवड यांनी स्वच्छता अभियानाची माहिती दिली. आजपासून स्थानिकांनी पुढाकार घेऊन किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाबरोबर महत्वाची भूमिका बजावण्याची गरज आहे, असे आवाहन केले. रत्नागिरी पंचायत समिती आरोग्य विभागातील अधिकारी श्री. केतकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी वैद्यकीय अधिकारी पावस डॉ. सातोपे, पूर्णगड पोलिस ठाण्यातील गोळप बिट अंमलदार देऊसकर, जनसेवा सामाजिक मंडळाचे अध्यक्ष अविनाश काळे, सचिव समित घुडे, महेश पालकर, ग्रामपंचायत सदस्य संदीप तोडणकर, समीक्षा शेडगे, प्रिया राडये, गोळप पोलिसपाटील नीलेश भाटकर, दीपक भाटकर, आशा सेविका प्राजक्ता लिंगायत, हरीश राडये, सुरेश राडये, आर्या पाटील, श्रीकांत मेस्त्री, प्रवीण राडये, साध्वी राडये, हर्षदा राडये, विनय बिडू, सीमा सुर्वे, सुप्रिया राडये, अद्वैत काळे आदी उपस्थित होते. अवंती काळे हिने सर्वांना किनारपट्टी स्वच्छता दिनाची शपथ सांगितली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97574 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..