भरभरून देणाऱ्या कोकणवासीयांना ठाकरेंनी वाऱ्यावर सोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरभरून देणाऱ्या कोकणवासीयांना ठाकरेंनी वाऱ्यावर सोडले
भरभरून देणाऱ्या कोकणवासीयांना ठाकरेंनी वाऱ्यावर सोडले

भरभरून देणाऱ्या कोकणवासीयांना ठाकरेंनी वाऱ्यावर सोडले

sakal_logo
By

rat१९p१४.jpg-
५११३३
दापोली : शिवसेना मेळाव्यात बोलताना आमदार योगेश कदम.
-rat१९p१५.jpg-
L५११३४
मेळाव्याला झालेली गर्दी.
------------
भरभरून देणाऱ्यांनाच सोडले वाऱ्यावर
आमदार कदमांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; राष्ट्रवादीकडून कायम कुरघोडीचे राजकारण
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १९ : मातोश्रीने आम्हाला भरभरून दिले आहे ते आम्ही विसरणार नाही. मात्र वंदनीय बाळासाहेबांचे वंशज म्हणजे शिवसेना नाही, तर वंदनीय बाळासाहेबांचे विचार म्हणजेच शिवसेना असल्याचे आपण ठणकावून सांगू असे. पण शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणवासीयांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाऱ्यावर सोडले, अशी टीका आमदार योगेश कदम यांनी दापोली येथे रविवारी (ता.१८) झालेल्या मेळाव्यात बोलताना सांगितले.
शिवसेनेचे नेते व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे याच्या दापोली येथे झालेल्या शिवसंवाद यात्रेत त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी व शिंदे गटात का सामील झालो हे स्पष्ट करण्यासाठी रविवारी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार कदम म्हणाले, हातात माईक आल्यावर ५० खोके ५० खोके बोलणे सोपे असते, मात्र जेव्हा या मतदारसंघात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसून २१० गावे त्यात बाधित झाली होती, हजारो कुटुंब उदध्वस्त झाली होती. मात्र सरकारी मदत पोचण्याअगोदर आपली मदत पोचली. १७ हजार कुटुंबांना धान्य वाटप केले. तेव्हा मी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना त्याची माहिती देवून मदत मागितली, त्यांना पाहणी करण्यासाठी बोलवले. मात्र मदत सोडाच ते पाहणी करण्यासाठीही आले नाहीत. तेच राष्ट्रवादीचे ८२ वर्षाचे खासदार शरद पवार, भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मतदार संघात निसर्ग चक्रीवादळाने झालेली हानी पाहावयास आले व त्यांनी जनतेचे अश्रू पुसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मतदारसंघात बोलावले, मात्र तेही आले नाहीत. त्यांनी शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडले. शेवटी एकनाथ शिंदे मदतीचे सर्व साहित्य घेऊन दापोली मतदारसंघात आले व त्यांनी ही सर्व मदत आपल्याकडे सुपूर्द केली. मदत सोडाच, भेटही न देणारे ५० खोके म्हणत टीका करण्यासाठी आता या मतदारसंघात आले होते.
महाविकास आघाडी रत्नागिरी जिल्ह्यात आणू देणार नाही असे म्हणत आपण त्याला विरोध करत जिल्हास्तरीय नियुक्त्या थांबविल्या होत्या. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सामित्यामधील सदस्य पदावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याऐवजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती आमच्या नेत्यांकडून करण्यात येणार होती, पण आपणा एकट्या आमदाराने त्याला विरोध केला. त्यामुळे या नियुक्त्या थांबल्या. राष्ट्रवादी कोकणात शिवसेना वाढवायला आली आहे का? राष्ट्रवादीचे शरद पवार कोकणात शिवसेना वाढवायला आले होते का? असा सवाल आमदार कदम यांनी केला.
आमदार कदम म्हणाले, महाविकास आघाडी झाली, शिवसेनचे मुख्यमंत्री झाले, पण निधी वाटप कोण करत होते तर ते राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री. कोकणमध्ये बहुसंख्येने असलेला कुणबी समाज हा शिवसेनेसोबत होता, मात्र तो राष्ट्रवादीसोबत येण्यासाठी मुंबई येथील कुणबी समाजाच्या वसतिगृहाच्या बांधणीसाठी त्यांना शासनाकडून परतफेडीच्या अटीवर ५ कोटी रुपयांचा निधी राष्ट्रवादीने दिला असल्याची माहिती देत दापोलीत कुणबी भवन येत्या ६ महिन्यांच्या कालावधीत हा योगेश कदम बांधून देईल असेही त्यांनी सांगितले.
दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी यांनी कहर केला. त्यावेळी झालेल्या अन्यायासंदर्भात मी आदित्य ठाकरे यांना भेटलो हे आपल्याला सहन होत नसल्याचे त्यांना सांगितले. मित्र म्हणून मी तुमच्या पाठीत खंजीर नाही खुपसला, जेव्हा मी प्रामाणिकपणे पक्ष वाढीचे काम करत असतानाही माझ्यावर अन्याय झाला, तेव्हा तुम्ही मित्र म्हणून माझ्या पाठीशी उभे नाही राहिलात. पालकमंत्री अनिल परब यांना का नाही सांगितलेत माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नको, असा सवालही योगेश कदम यांनी केला.
सत्ता स्थापनेच्या वेळी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना एकत्र आणले होते, त्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसच्या सोनिया गांधी, शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आम्ही एकनिष्ठ राहू अशी शपथ घेण्यास सांगितले होते. आमच्या तोंडी बाळासाहेब वगळता अन्य कोणाची नावे नाही निघाली. कडवा शिवसैनिक या दोघांची नावे कशी घेईल. तेव्हा आम्ही बोललो होतो साहेब असे असेल तर नको सत्ता आम्हाला.
या मेळाव्याला दापोली विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांच्या सभेपेक्षा दुप्पट गर्दी या मेळाव्याला होती.
-------
चौकट
आमदार जाधवांना पराभूत करणारच
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा समाचार घेताना आमदार योगेश कदम म्हणाले, मला दापोली विधानसभेची चिंता नाही. आम्ही या मतदारसंघात पुन्हा भगवा फडकवणारच. मात्र तुम्हाला गुहागर मतदारसंघात पराभूत केल्याशिवाय राहणार नाही.
--------
चौकट
हर्णैमध्ये मासेमारीवर आधारित प्रकल्प
दापोली विधानसभा मतदारसंघाचा विकास हेच आपले ध्येय असून प्रकल्प आणून बेरोजगारी दूर करणार. हर्णै येथील शासकीय जागेत मासेमारीवर आधारित प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. लोकांकडून हात वर करून घेऊन शपथ घेणे सोपे असते. मात्र विकास करणे कठीण असते, असा टोला त्यांनी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना लगावला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97602 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..