चिपळुणात जंतुनाशकासह धूर फवारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात जंतुनाशकासह धूर फवारणी
चिपळुणात जंतुनाशकासह धूर फवारणी

चिपळुणात जंतुनाशकासह धूर फवारणी

sakal_logo
By

ratchl192.jpg-
51145
चिपळूणः डेंग्यूबाबत नागरिकांना मार्गदर्शन करताना आरोग्य विभागाचे अधिकारी.
----------
चिपळुणात जंतुनाशकासह धूर फवारणी
डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळल्याने सतर्कता; आरोग्य विभागाकडून सर्व्हेक्षण
चिपळूण, ता. १९ः शहरात डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी चिपळूण पालिकेत आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. शहरात डेंग्यूची साथ पसरू नये म्हणून विशेष खबदारी घेतली जात आहे. तसेच आरोग्य विभागाकडून शहरात जंतुनाशक फवारणी व धूर फवारणी, सर्व्हेक्षण सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून शहरात ताप सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. यातील काही रुग्णांममध्ये डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील उघडी व तुंबलेली गटारे तसेच साचलेले पाण्यामुळे डेंग्यूची साथ पसरते. गणेशोत्सवानंतर पाच रुग्ण आढळून आले होते. त्यावर सतर्क झालेल्या जिल्हा आरोग्य विभाग, तालुका आरोग्य विभाग, पालिका आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्यास सुरवात केली. पालिकेच्या आरोग्य विभागानेही याबाबत गंभीर दखल घेतली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा हिवपात अधिकारी डॉ. संतोष यादव यांनीही भेट देत शहरातील विविध परिसराची पाहणी केली होती. विविध उपाययोजना राबविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही सुचनाही केल्या होत्या.
पालिकेच्या आरोग्य विभागाचे वैभव निवाते, डॉ. डी. डी. कदम, राम देवळेकर, महेश जाधव यांच्यासह आरोग्य सेविका, सेविका व आशा स्वयंसेविका शहरातील विविध भागात सर्व्हेक्षण करीत आहेत. नागरिकांना स्वच्छतेबाबत सुचनाही करीत आहेत. सर्व्हेक्षणासह शहरातील विविध भागात फवारणी केली जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, मनोहर तायडे उपस्थित होते.

------नागेश पाटील

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97608 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..