अंगणवाडी सेविकांची आज निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी सेविकांची आज निदर्शने
अंगणवाडी सेविकांची आज निदर्शने

अंगणवाडी सेविकांची आज निदर्शने

sakal_logo
By

अंगणवाडी सेविकांची
आज निदर्शने
रत्नागिरी : अनेक प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २०) अंगणवाडी सेविका जिल्हा परिषदेवर धडकणार आहेत. शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असून ते बंद आहेत. अंगणवाडी कामकाज लिखाणासाठी रजिस्टर मिळावीत. शासनाने मान्य केल्याप्रमाणे पेन्शन मिळावी, अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजता प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथून हजारो सेविका शांततेच्या मार्गाने जिल्हा परिषद येथे निवेदन देण्याकरीता जिल्हा परिषद येथे धडकणार आहेत. याकरिता सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्ष सौ. संज्योती शिंदे यांनी केले आहे.
--------
कीर महाविद्यालयात
साठे यांना अभिवादन
रत्नागिरी : येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात अनुगामी लोकराज्य महाअभियान व महाविद्यालय मराठी विभाग यांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभिवादन कार्यक्रम आयोजित केला. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा युनिट स्काऊट गाईड लीडर संजय आयरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र लोकसाहित्य व सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांचे मराठी साहित्यातील योगदान, त्यांची देश-विदेशातील ख्याती यावर विवेचन केले. अनुलोम संस्था रत्नागिरी, सिंधुदुर्गचे उपविभागप्रमुख रवींद्र भोवड यांनी अभिवादन कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. या वेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, मराठी विभागप्रमुख अनन्या धुंदूर, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. अनुलोम रत्नागिरीचे भाग जनसेवक मंगेश मोभारकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97610 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..