सभासदांसाठी १५ टक्के लाभांश मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सभासदांसाठी १५ टक्के लाभांश मंजूर
सभासदांसाठी १५ टक्के लाभांश मंजूर

सभासदांसाठी १५ टक्के लाभांश मंजूर

sakal_logo
By

51110
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा राज्य कर्मचारी संघटनेच्या सभेत बोलताना अध्यक्ष भाग्यवंत वाडीकर.

सभासदांसाठी १५ टक्के लाभांश मंजूर

सरकारी कर्मचारी पतसंस्था सभा; सिंधुदुर्गनगरीतील सभेत विविध विषयांवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था ओरोस या संस्थेच्या ३५व्या वार्षिक सभेत सभासदांसाठी १५ टक्के लाभांश मंजूर करण्यात आला; मात्र दोन सभासदांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरकत घेतल्यामुळे दरवर्षी लाभांश व्यतिरिक्त सभासदांना दिले जाणारे रुपये १२०० ची भेटठेव पावतीबाबत नवीन संचालक मंडळ निर्णय घेईल, अशी भूमिका संस्थाध्यक्ष भाग्यवंत वाडीकर यांनी घेतली.
संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १८) संस्थेच्या सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात पार पडली. यावेळी दहावी व बारावीमध्ये विशेष गुणप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेमध्ये कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले नाहीत.
दरम्यान, सभेच्या सुरुवातीला मागील वर्षात निधन झालेले संस्थेचे सभासद, सहकार क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, देशबांधव, शहीद जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष वाडीकर, उपाध्यक्ष दिनेश खवळे, संचालक राजू सावंत, गुरुदास नाईक, वर्षा मोहिते, कृष्णा आडणेकर, राजेंद्र शिंगाडे, श्रुती राणे, सचिव नीलेश कुडाळकर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत विलास चव्हाण, सत्यवान माळवे, श्रीप्रसाद मराठे, देविदास आडारकर, तानाजी सावंत, राजन साळुंखे, जयप्रकाश जाधव, राजेश चव्हाण, वंदन गावडे, प्रवीण सावंत, राजन ठाकूर, संजय पवार, अमित गंगावणे वगैरे सभासदांनी भाग घेतला. सभेचे प्रास्ताविक संचालक वर्षा मोहिते यांनी, आभार उपाध्यक्ष खवळे यांनी मानले.
--
चौकट
प्रश्नांची उत्तरे मिळाल्याने वाद टळला
या संस्थेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पतसंस्थेच्या निवडणुकीला ३० पर्यंत शासनाने स्थगिती दिली आहे; मात्र संस्थेची वार्षिक सभा घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून या संस्थेला परवानगी दिली होती. संस्थेच्या दोन सभासदांनी याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे हरकत घेऊन ही वार्षिक सभा रद्द करावी व लाभांशाचे वाटप नियमबाह्य झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे ही सभा वादळी ठरणार अशी चिन्हे होती; पण संस्थेचे अध्यक्ष वाडीकर यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे सभासदांना दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97614 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..