रोटरीने शिक्षणक्षेत्रातही पुढाकार घ्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरीने शिक्षणक्षेत्रातही पुढाकार घ्यावा
रोटरीने शिक्षणक्षेत्रातही पुढाकार घ्यावा

रोटरीने शिक्षणक्षेत्रातही पुढाकार घ्यावा

sakal_logo
By

टीपः swt१९१०.jpg मध्ये फोटो आहे.
सावंतवा़डी ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार करताना रोटरीचे पदाधिकारी.

रोटरीने शिक्षणक्षेत्रातही पुढाकार घ्यावा

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ः रोटरी परिवारातर्फे सावंतवाडीत सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः रोटरी क्लबमध्ये स्वार्थापलीकडे झोकून देऊन काम केल्यास नेतृत्व तयार होते. विविध समाजोपयोगी उपक्रमांसह शालेय शिक्षण तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील काम करण्यासाठी रोटरीने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
रोटरी क्लब सावंतवाडी, इनरव्हील क्लब व रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडी यांच्यावतीने शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार केसरकर यांचा आज येथे सत्कार करण्यात आला. रोटरी चॅरिटेबल ट्रस्टच्या नूतन वास्तूत हा सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी आयपीडीजी गौरीश धोंड उपस्थित होते. त्यांचाही शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर कोल्हापूर येथील विशेष कार्यक्रमात गौरविण्यात आल्याबद्दल राजेश पनवेलकर यांच्यासह शिक्षक दिनानिमित्त १० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात रोटरी क्लबच्या अध्यक्षा विनया बाड यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली‌. शिक्षणमंत्री केसरकर यांचा सत्कार रोटरीच्या माध्यमातून करण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुहास नायडू यांनी मंत्री केसरकर व आयपीडीजी गौरीश धोंड यांच्या आजवरच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला. शिक्षक दिनानिमित्त भावना गावडे, शमिक नाईक, रश्मी सावंत, ऐश्वर्या पोकळे, विश्वनाथ राऊळ, केशव जाधव, विठ्ठल सावंत, शुभांगी खानोलकर, पल्लवी कोळंबेकर यांना गौरविण्यात आले. आयपीडीजी धोंड यांच्याकडून रोटरीला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व व्हिलचेअर भेट स्वरुपात देण्यात आल्या. यावेळी रोटरीचे प्रमोद भागवत, अॅड. दर्शना रासम, मिहिर मठकर, दिलीप म्हापसेकर, डॉ. राजेश नवांगुळ, साई हवालदार, आनंद रासम, राजन हावळ, बाबल्या दुभाषी, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.
..............
चौकट
‘हॅप्पी स्कूल’ संकल्पना राबवा
यावेळी धोंड यांनी मनोगत व्यक्त करताना रोटरीची स्वतःची इमारत माझ्या कार्यकाळात उभी राहिल्याचा विशेष आनंद होत असल्य़ाचे सांगितले. माझ्या काळात उभे राहिलेले रोटरीचे हे चौथे भवन आहे. वैद्यकीय क्षेत्रात रोटरीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. विद्यार्थिनींसाठी सायकल, गरजूंना व्हिलचेअर तसेच १५० कॉन्स्नट्रेटर, कार्डियाक अॅम्ब्युलन्स दिली, असे ते म्हणाले. रोटरीची ‘हॅप्पी स्कूल’ ही संकल्पना शिक्षणमंत्री केसरकर यांच्या मदतीने आपल्या भागात राबविण्यासाठी प्रयत्नशील रहा, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97615 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..