नवाबागला मच्छीमारांमध्ये हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवाबागला मच्छीमारांमध्ये हाणामारी
नवाबागला मच्छीमारांमध्ये हाणामारी

नवाबागला मच्छीमारांमध्ये हाणामारी

sakal_logo
By

नवाबागला मच्छीमारांमध्ये हाणामारी

पोलिसांकडून समज; होड्या लावण्याच्या जागेवरून दोन गट भिडले

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १९ ः उभादांडा-मूठ किनारपट्टी खचल्याने उभादांडा-कुर्लेवाडी ते मूठवाडी परिसरात मच्छिमारी करणारे सर्व मच्छिमार व्यावसायिक नवाबाग किनाऱ्यावर होड्यांसह आल्याने स्थानिक व उभादांडा मच्छिमारांमध्ये रविवारी (ता.१९) सायंकाळी होड्या लावण्याच्या जागेवरून वाद झाला. यात शाब्दिक बाचाबाची होऊन मारहाणीपर्यंत विषय गेला. शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
यातील दोन्ही गटांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. शांतता व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी दोन्ही गटांना जमावबंदी लेखी समज देण्यात आली.
जूनपासून समुद्रात झालेल्या सागरी तुफानामुळे समुद्रांतर्गत पाणी व वाऱ्यांमुळे लाटा खवळून उभादांडा-कुर्लेवाडी ते उभादांडा-मुठवाडी किनारपट्टीची प्रचंड धुप झालेली आहे आणि होत आहे. त्या भागातील किनाऱ्यावर मच्छिमारी करून आल्यानंतर होड्या किनाऱ्यावर काढण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. यामुळे सागरी तुफान व वारे कमी होताच मच्छिमारी हा नेहमीचा रोजी रोटीचा व्यवसाय करण्यासाठी उभादांडा-कुर्लेवाडी ते मुठ या भागातील पारंपारीक मासेमारी करणाऱ्या मच्छिमाऱ्यांनी आपल्या मच्छिमारी होड्या मच्छिमारीस सुरक्षित किनारा म्हणून नवाबाग येथे आणल्या व मच्छिमारी व्यवसाय सुरू केला होता. यानंतर नवाबाग येथील पारंपारीक मच्छिमारांनी वेंगुर्ले मस्य खात्याकडे याबाबत तक्रार करून उभादांडा येथील मच्छिमारांच्या होड्या त्यांच्या जागी हलविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी नैसर्गिक आपत्तीमुळे ते आल्याने काही काळ ते नवाबाग येथून आपला व्यवसाय करतील. त्यांच्या ठिकाणीची जागा पूर्ववत झाल्यानंतर ते आपल्या जागी होड्या घेऊन जातील, असे मत्स्यखात्याच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारदाराकडे स्पष्ट केल्याचे समजते.
सागरी तुफान सध्या कमी झाल्याने नवाबागमधील किनाऱ्यावरून सर्वच मच्छिमारांनी मासेमारी सुरू केली आहे. त्यामुळे या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मासळी व्यापारी व ग्राहकांना मिळू लागली. यात प्रत्येक मच्छिमार व्यावसायिक आपली मासळी लवकर विकली जावी, या उद्देशाने मासळीचे दर कमी करून ती विकतो. त्यानुसार उभादांडा भागातील मच्छिमारांनी दर कमी केल्याने आपल्या मासळीस भाव मिळाला नाही, असे म्हणणे मांडत उभादांडा मच्छिमार व्यावसायिकांशी नवाबागमधील मच्छिमारांनी वाद घातला. शनिवारी (ता.१७) सायंकाळी नवाबागमधील मच्छिमार तसेच उभादांडा-कुर्लेवाडी व मुठ भागीतील मच्छिमारांमध्ये वाद झाला.
-------------
चौकट
मच्छीमार बैठकीस अनुपस्थित
नवाबाग व उभादांडा-कुर्लेवाडी-मुठ भागातील पारंपारीक मच्छिमारातच हा वाद झाला. तोही नवाबाग किनाऱ्यावर होड्या उभादांडा भागातील लावल्याने होता. या वादाशी आधुनिक रापणीने मच्छिमारी करणाऱ्यांचा संबंध नसल्याचे मच्छिमारातूनच बोलले जात आहे. वैयक्तीकरित्या हा वाद मिटविण्यासाठी रविवारी (ता.१८) दुपारी सातेरी मंदिर येथे बैठक बोलविली होती. त्यास नवाबागमधील मच्छिमार आलेच नाहीत; मात्र उभादांडातील सुमारे १५० मच्छिमार उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97617 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..