बांद्यात नवरात्रोत्सवानिमित्त २६ पासून विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात नवरात्रोत्सवानिमित्त 
२६ पासून विविध कार्यक्रम
बांद्यात नवरात्रोत्सवानिमित्त २६ पासून विविध कार्यक्रम

बांद्यात नवरात्रोत्सवानिमित्त २६ पासून विविध कार्यक्रम

sakal_logo
By

51149
राकेश केसरकर, अनिल नाटेकर, ओंकार नाडकर्णी.

बांद्यात नवरात्रोत्सवानिमित्त
२६ पासून विविध कार्यक्रम
बांदा, ता. १९ ः येथील गांधीचौक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने २६ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी राकेश केसरकर, तर उपाध्यक्षपदी अनिल नाटेकर, सचिवपदी विवेक विरर्नोडकर, तर खजिनदारपदी ओंकार नाडकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली.
या बैठकीमध्ये विविध‌ धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये २६ ला श्री देवी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना, २७ ला ‘भाव अंतरी’चे फेम प्रसिद्ध गायक मयूर गवळी दशावतारी नाटक, २८ ला गायन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अनुक्रमे ५५५५, ३३३३, २२२२ रुपये अशी बक्षिसे आहेत. २९ व ३० ला भव्य खुली दांडिया स्पर्धा होणार असून अनुक्रमे ७७७७, ४४४४, २२२२ रुपये व हिट जोडीसाठी आकर्षक पारतोषिक देण्यात येणार आहे. २ ऑक्टोबरला १५ वर्षाखालील मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. अनुक्रमे २२२२, ११११, ५५५ रुपये व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर ग्रुपडान्स स्पर्धेसाठी अनुक्रमे ३३३३, २२२२, ११११ रुपये व उत्तेजनार्थ बक्षिसे आहेत. ३ ला डबलबारी भजनाचा सामना, ४ ला गोव्यातील नामांकित ऑक्रेस्ट्रा व सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ, ५ ला सायंकाळी ५ वाजता विसर्जन मिरवणूक होणार आहे. दांडिया स्पर्धेसाठी ओंकार नाडकर्णी व अक्षय मयेकर, (फॅन्सी ड्रेस, ग्रुप डान्ससाठी राजदीप पावसकर, गायन स्पर्धेसाठी प्रथमेश गोवेकर, धनेश नाटेकर येथे संपर्क साधावा. नवरात्रोत्सवात भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रम व तीर्थप्रसादाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष राकेश केसरकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97619 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..