पावशीत आज रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावशीत आज 
रक्तदान शिबिर
पावशीत आज रक्तदान शिबिर

पावशीत आज रक्तदान शिबिर

sakal_logo
By

पावशीत आज
रक्तदान शिबिर
कुडाळ ः कुडाळ तालुका भाजप युवा मोर्चाच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (ता. २०) सकाळी नऊ ते दुपारी साडेबारापर्यंत पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन युवा मोर्चा ओरोस मंडळ अध्यक्ष श्रीपाद (पप्या) तवटे व कुडाळ मंडळ अध्यक्ष रुपेश कानडे यांनी केले आहे.
--
वैभववाडीत
दमदार पाऊस
सिंधुदुर्गनगरी : चोवीस तासांत वैभववाडीत सर्वाधिक २.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण सरासरी ३०८८.६ मिलीमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय पाऊस मिलीमीटर परिमाणात असा ः आहेत. देवगड- १.३ (२४५६.२), मालवण- ०.१ (२७९५.१), सावंतवाडी- २.३ (३४३४.०), वेंगुर्ले-१.१ (२८७८.६), कणकवली- ०.५ (३३०६.१), कुडाळ- ०.१ (३२८९.८), वैभववाडी- २.७ (३६७४.९), दोडामार्ग- ०.४ (३४५८.०).
--
गोठोसमध्ये
भजन स्पर्धा
कुडाळ ः श्री देवी भावई सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ, गोठोसतर्फे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा श्री देवी भावई मंदिर गोठोस येथे आयोजित केली आहे. ही स्पर्धा २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान होणार आहे. विजेत्यांना ४००१, ३००१, २००१, १००१ रुपये व कायमस्वरुपी चषक तसेच वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहभागी प्रत्येक मंडळाला चषक व १००० रुपये मानधन देण्यात येईल. विलास गोठोस्कर यांच्याशी संपर्क साधावा.
--
आयनोडे मंदिर
परिसर स्वच्छ
दोडामार्ग ः आयनोडे येथील श्री भूतनाथ मंदिरात ‘भारत माता की जय’ संघटनेतर्फे श्रमदानांतर्गत सफाई केली. मंदिरात गेले आठ दिवस संघटनेचे शाखानिहाय कामकाज सुरू होते. त्याचा समारोप रविवारी झाला. आज ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी वैभव रेडकर, सचिन तेंडुलकर, ओंकार केळकर, रोहन शेटकर, शांताराम शेटकर, मधुकर शेटकर, साईल शेटकर, विष्णू तर्पे, राज शेटकर, निखिल गवस, अजय राऊत, कुणाल शेटकर आदींसह आयनोडे येथील सुनील सावंत उपस्थित होते.
--
भंडारी हायस्कूलचे
शिष्यवृत्तीत यश
मालवण ः एनएमएमएस (आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचे १५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. यात सौरवी देसुरकर, पार्थ चव्हाण, स्वरुप मेस्त्री या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना एच. बी. तिवले, अवसरे, बनसोडे, चव्हाण या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे भंडारी ए. सो. हायस्कूलचे चेअरमन विजय पाटकर यांनी अभिनंदन केले आहे.
----------------
नीलम शिंदे
शिंदे गटात
मालवण ः शिवसेनेच्या कार्यकर्त्या नीलम शिंदे यांनी रविवारी शिवसेना महिला उपजिल्हा संघटक वर्षा कुडाळकर यांच्यासोबत शिंदे गटात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. रत्नागिरी येथे झालेल्या कार्यक्रमात सविता शेळके, अनघा रांगणेकर आदी उपस्थित होत्या. यावेळी कणकवलीचे माजी नगरसेवक भूषण परुळेकर, मालवणचे उपशहरप्रमुख किसन मांजरेकर, अमोल लोके आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97632 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..