दुग्‍धोत्‍पादनातून रोजगाराच्या नव्या संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुग्‍धोत्‍पादनातून रोजगाराच्या नव्या संधी
दुग्‍धोत्‍पादनातून रोजगाराच्या नव्या संधी

दुग्‍धोत्‍पादनातून रोजगाराच्या नव्या संधी

sakal_logo
By

51176
कणकवली : दुग्‍ध प्रक्रिया कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मान्यवर.

दुग्‍धोत्‍पादनातून रोजगाराच्या नव्या संधी

संदीप सावंत : कणकवलीत स्वयंदीप चॅरिटेबल संस्थेतर्फे प्रशिक्षण

कणकवली, ता.१९ : दुधापापासून तयार केलेल्‍या अनेक वस्तू रोजच्या आहारात वापरल्‍या जातात. ते पदार्थ आपण घरी तयार केले तर आपल्‍या कुटुंबाला स्वच्छ आणि निर्जंतूक पदार्थ खायला मिळतील. तसेच या पदार्थांना बाजारात मोठी मागणी असून नव्या रोजगार संधी निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादन स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप सावंत यांनी केले.
कणकवलीत स्वयंदीप ट्रस्टच्यावतीने दुग्‍ध प्रशिक्षण कार्यशाळा झाली. यात श्री.सावंत यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्‌घाटन गोकुळ दूध प्रकल्पाचे रमेश ढोकरे आणि राजेश गावकर यांनी केले. तर स्वयंसिद्धा कोल्हापूरच्या प्रिया भुयेकर, राजश्री सावंत, स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप सावंत, सचिव संतोष सावंत, अश्विनी तावडे, माधुरी सावंत, सिद्धी सावंत, अॅड. मनीषा सावंत आदींनी मार्गदर्शन केले.
‘गोकुळ’चे श्री. ढोकरे म्‍हणाले, दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत खूप मागणी आहे आणि त्यामुळे महिलांनी त्याचा सखोल अभ्यास करून व योग्य ते प्रशिक्षण घेऊन या उद्योगात उतरावे. राजेश गावकर म्‍हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. गावागावांमध्ये जास्त प्रमाणात दुग्ध उत्पादन होताना दिसते. दुग्‍ध प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाली तर महिलांना मोठी रोजगार संधी उपलब्‍ध होणार आहे. त्‍यासाठी स्वयंदीप ट्रस्टचा उपक्रम महत्‍वपूर्ण आहे.
या कार्यशाळेत स्वयंसिद्धाच्या प्रशिक्षिका प्रिया भुयेकर आणि राजश्री सावंत यांनी महिलांना पदार्थ करताना, तसेच विक्री करताना कोणकोणती काळजी घ्यावी, स्वच्छता कशी राखावी आणि मार्केटिंग याबाबत मार्गदर्शन केले. तनिष्का सावंतने सूत्रसंचालन केले. मनीषा सावंतने आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97650 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..