रत्‍नागिरीतील खल्वायन मैफलीत मेस्त्रींचे गायन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्‍नागिरीतील खल्वायन 
मैफलीत मेस्त्रींचे गायन
रत्‍नागिरीतील खल्वायन मैफलीत मेस्त्रींचे गायन

रत्‍नागिरीतील खल्वायन मैफलीत मेस्त्रींचे गायन

sakal_logo
By

51187
रत्‍नागिरी : येथील खल्वायन संगीत सभेत गायन करताना मनोज मेस्त्री.

रत्‍नागिरीतील खल्वायन
मैफलीत मेस्त्रींचे गायन
कणकवली, ता.१९ : गेली पंचवीस वर्षे रत्‍नागिरीतील खल्‍वायन संस्था शास्त्रीय संगीत तसेच सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देत आहे. या खल्‍वायन संगीत सभेची २८१ वी मैफल कणकवलीतील गायक मनोज मेस्त्री यांच्या अवीट गायनाने रंगली.
मनोज मेस्त्री यांना तबलावादक रामकृष्ण करंबेळकर आणि संवादिनीवादक वरद सोहोनी यांनी साथ देऊन कार्यक्रमात रंगत आणली. मेस्त्री यांनी ‘जोगकंस’ रागामध्ये बडा ख्याल, छोटा ख्याल आणि तराणा सादर केला. त्यानंतर ‘मधुरन्जनी’ रागात झप तालामधील ख्याल व जोडून द्रुत रचना सादर केली. त्‍या पाठोपाठ बिहाग रागामध्ये बंदी ठुमरीही बहारदारपणे पेश केली. रागदारी सादरीकरणानंतर पु.ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘माझे जीवन गाणे’, ‘शब्दावाचून कळले सारे’ या गाण्यांनंतर एक निर्गुणी भजन, एक नाट्यपद, एक अभंग आणि मग भैरवी! असा हा दोन तासांचा मैफलीचा प्रवास रसिकांसाठी मंत्रमुग्‍ध करणारा ठरला. तुफान पाऊस असतानाही मनोज मेस्त्री यांच्या संगीत मैफलीसाठी रसिकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कणकवलीतील संगीत रसिकांसह गंधर्व संगीत सभेची टीमही रत्‍नागिरीत उपस्थित होती. ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित विश्वनाथजी कान्हेरे बुवांसोबतच रत्नागिरीतील संगीत क्षेत्रातील रसिकांनीही मेस्त्री यांच्या गायनाला दाद दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97661 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..