कोयना प्रकल्पातील कंत्राटी कामगार आशेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोयना प्रकल्पातील कंत्राटी कामगार आशेवर
कोयना प्रकल्पातील कंत्राटी कामगार आशेवर

कोयना प्रकल्पातील कंत्राटी कामगार आशेवर

sakal_logo
By

कोयनेतील कंत्राटी कामगारांना
न्याय मिळण्याची आशा
चिपळूण, ता. १९ : कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनामध्ये जीव धोक्यात घालून काम केलेल्या वीज कामगारांनाही नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसे झाल्यास कोयना प्रकल्पात वर्षानुवर्ष कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या २५० हून अधिक कंत्राटी कामगारांना न्याय मिळेल. महावितरण कंपनीतील १२०० कंत्राटी कामगाराना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
याबाबत कामगार संघटनेचे नेते संतोष घाडगे म्हणाले, महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज पंपन्यांमध्ये २५ हजार पदे रिक्त आहेत. कंत्राटी कामगारांनी कोरोना काळात इमानेइतबारे काम केले आहे. वीज सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने बाराही महिने कामगार राबतात. कोरोनामध्ये कंत्राटी वीज कामगार २४ तास कार्यरत होते. त्यामुळे या कालावधीत कर्तव्यावर असताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने जवळपास ६५ कंत्राटी कामगारांना जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयांसह सार्वजनिक सेवा कार्यरत ठेवण्यासाठी वीज पुरवठा अखंडित ठेवण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. त्याची दखल घेत सरकारने वीज पंपन्यांमध्ये नियमित नोकरभरती करताना कंत्राटी वीज कामगारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली आहे, असे श्री. घाडगे यानी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97690 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..