रत्नागिरी-मत्सोत्पनाबरोबरच भाजीपाला उत्पादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-मत्सोत्पनाबरोबरच भाजीपाला उत्पादन
रत्नागिरी-मत्सोत्पनाबरोबरच भाजीपाला उत्पादन

रत्नागिरी-मत्सोत्पनाबरोबरच भाजीपाला उत्पादन

sakal_logo
By

rat19p23.jpg-
51200
रत्नागिरी ः वेतोशी येथे उभारलेले शेततळे.
- rat19p24.jpg-
L51202
पिकवलेला भाजीपाला
- rat19p25.jpg-
51201
रुपचंद जातीचा मासे दाखवताना अशोक साळुंखे.
-----------
काही सुखद---लोगो

शेततळ्यात मत्सोत्पनाबरोबरच भाजीपाला उत्पादन
अशोक साळूंखेंचा वेतोशीत प्रयोग ; कृषी पर्यटनाचा मानस, मत्स्यशेतीतून 4 टन मिळाले मासे
रत्नागिरी, ता. 19 ः शेतीला बारमाही पाणी आणि मत्स्यपालनातून उत्पन्नाचे साधन असा दुहेरी हेतू वेतोशी येथे अशोक साळुंखे यांनी बांधलेल्या शेततळ्यातून साध्य झाला आहे. कृषी विभागाकडील एकात्मिक फलोत्पादन योजनेमधून बांधलेले हे तळे कोकणातील सर्वात मोठे असून त्यावर उन्हाळी शेती यशस्वीपणे करण्यात आली आहे.
कृषी विभागाकडील एकात्मिक फलोत्पादन योजनेमधून एक एकरवर जागेत 52 बाय 52 मीटरचे शेततळे उभारण्यात आले आहे. त्याची खोली सुमारे 9 मीटर असून त्याचे काम 2020 मध्ये पूर्ण झाले. वेतोशीच्या कातळावर उभारलेल्या शेततळ्यासाठी 3 लाख 39 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. गतवर्षी याच शेततळ्यातील पाण्याचा वापर करुन साळुंखे यांनी दोन एकरवर भाजीपाला लागवड केली होती. कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी श्री. साळुंखे यांनी पावले उचलली आहेत. या तळ्याचा उपयोग त्यांनी मत्स्यपालनासाठीही केला आहे. दोन वर्षांपूर्वी श्री. साळुंखे यांनी मत्स्य विभागाकडून मत्स्य पालनाविषयी प्रशिक्षण घेतले होते. त्याचा उपयोग करून याच शेततळ्यामध्ये ‘रुपचंद’ जातीच्या माशांचे उत्पादन करण्यास आरंभ केला आहे. परराज्यातून 15 हजार बीज त्यांनी आणले होते. सहा महिने त्याचे जतन करण्यात आले आहे. रुपचंद मासा हा कोणत्याही वातावरणात टिकू शकतो. बीच टाकल्यानंतर सहा महिन्यात त्याची वाढ होते. या शेततळ्यातून पहिल्या टप्प्यात त्यांना 4 टन मासे मिळाले. दुसर्‍या टप्प्यात चार टन मासे मिळाले असून किलोला चारशे ते पाचशे रुपये दर मिळाला. आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये हा मासा खाण्यासाठी खरेदी केला जातो. या प्लांटला सोलर यंत्रणेने विजेचा पुरवठा होतो. देखभालीसाठी एका व्यक्तीची चोविस तास नियुक्ती केली आहे.
-------------
चौकट
भाजीपाला लागवडीवर भर

भात कापणी आटोपली की विविध प्रकारची भाजीपाला लागवड करतात. त्यांनी एक एकरवर भूईमुगाची लागवड केली. खाण्यासाठी वापरण्यात येणार्‍या भूईमुग शेंगाचे बियाणे त्यांनी आणले होते. यामधून एक टन शेंगा मिळाल्या. त्यातील दाण्यापासून 72 किलो शेंगतेल त्यांना मिळाले. यंदा त्यांनी तेल काढण्यासाठीचे भुईमुगाचे बियाण्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या बरोबरच टॉमेटो, पावटा, चवळी, हरभरा, कोथींबीर, पालक, वाटाणे यारखी भाजीची लागवड करतात. घरामध्ये वापरासाठी लागणारी सेंद्रीय भाजी त्यांच्याच शिवारातून आणली जाते. उर्वरित भाजी मिरजोळे एमआयडीसी येथील त्यांच्या हॉटेलमध्ये वापरली जाते. 1 टनाहून अधिक भाजीपाला व फळभाज्यांचे उत्पादन ते घेतात.
----
कोट
शेतीची आवड असल्यामुळे नोकरी करत असतानाही भातशेतीला आरंभ केला. शक्य होईल त्याप्रमाणे त्यात शेतीपुरक व्यावसायाची भर टाकली. भविष्यात कृषी पर्यटन केंद्र म्हणून हा परिसर विकसित करण्यासाठी पावले उचलली आहेत.
- अशोक रामचंद्र साळुंखे, वेतोशी

-------बातमीदार---कळंबटे...

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97701 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..