गुहागरमधील पाच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागरमधील पाच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
गुहागरमधील पाच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

गुहागरमधील पाच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

sakal_logo
By

गुहागरमधील पाच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
गुहागर : तालुक्यातील मुदत पूर्ण झालेल्या पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. थेट सरपंच निवडणूक होणार असून ही सर्व पाच ही सरपंचपदे महिला भूषविणार आहेत. अंजनवेल, वेलदूर, चिंद्रावळे, वेळंब व परचुरी या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका होणार आहेत. यामध्ये अंजनवेल- नामाप्र स्त्री, वेलदूर- नामाप्र स्त्री, चिंद्रावळे- नामाप्र स्त्री, वेळंब- सर्वसाधारण स्त्री, परचुरी- सर्वसाधारण स्त्री असे सरपंच आरक्षण आहे. या पाच ग्रामपंचायतीमधील सदस्य निवडणूक व सरपंच निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर झाले आहेत.
----------
वेळंबला वर्षावास समाप्ती कार्यक्रम
गुहागर : वेळंब येथे श्रावस्ती बुद्ध परिवेणमध्ये वर्षावासाची सांगता कार्यक्रम झाला. भगवान गौतम बुद्धांचा विज्ञानवादी धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना दिला. त्याचे योग्य पालन आपण करायला हवे. सद्या नोकरी मिळत नाही म्हणून बौद्ध तरूणांमध्ये निराशा पसरली आहे. मात्र, त्यामुळे शिक्षण सोडू नका. शिक्षण हाच आपल्या सर्वांगीण प्रगतीचा राजमार्ग असून आपल्या बौद्ध तरुणांना त्या शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीच शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मुकुंद कासार यांनी केले.
कार्यक्रमाला माजी गटविकास अधिकारी मिलिंद पवार उपस्थित होते. भगवान बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण एका विद्यार्थिनीने केले. वर्षावासात सहभागी झालेल्या सर्व मुलांना संस्थेच्या मुंबई व गाव शाखेच्या वतीन बुद्ध वंदना पुस्तिका, वही - पेन, कंपास बॉक्स, टिफीन भेट देण्यात आला.
------
आबलोली ग्रामपंचायतीने केली विधवा प्रथा बंद
गुहागर ः पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे आदींसह विधवा प्रथा बंद करण्याचा एेतिहासिक निर्णय गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीने घेतला आहे. आबलोलीची विशेष ग्रामसभा आबलोली शाळेत सरपंच सौ. श्रावणी अनिकेत पागडे यांचे अध्यक्षतेखाली झाली. विधवा प्रथा बंद करण्याबाबत ग्रामसेवक बी. बी. सूर्यवंशी यांनी शासनाचे परिपत्रक वाचून मार्गदर्शन केले. त्यानंतर सौ. कविता हेमंत पवार यांनी विधवा प्रथा बंद ठरवाची सूचना मांडली. या ठरावाला सिद्धार्थ जाधव यांनी अनुमोदन दिले. ग्रामभेला उपसरपंच आशिष भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, पोलिस पाटील महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, तुकाराम पागडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97705 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..