बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन, सई विजेते वेद, पद्मश्रीला उपविजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन, सई विजेते वेद, पद्मश्रीला उपविजेतेपद
बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन, सई विजेते वेद, पद्मश्रीला उपविजेतेपद

बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन, सई विजेते वेद, पद्मश्रीला उपविजेतेपद

sakal_logo
By

rat१९p२७.jpg-
५१२१८
रत्नागिरी : जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धेतील विजेते खेळाडू.
-----------
बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन, सई विजेते
वेद, पद्मश्रीला उपविजेतेपद
रत्नागिरी : बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित (कै.) अनिल कानविंदे स्मृती १३ वर्षांखालील वयोगटाच्या रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा रविवारी (ता. १८) झाल्या. ६ फेऱ्यांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेतील खुल्या गटात रत्नागिरीच्या आर्यन धुळप याने ५ गुणांसह विजेतेपद तर वेद डोईफोडे याने ४.५ गुणांसह उपविजेतेपद प्राप्त केले. रत्नागिरीच्या ज्योतिरादित्य गडाळे व रुमीन वास्ता यांनी प्रत्येकी ४ गुणांसह तिसरा व चौथा तर चिपळूणच्या सुतेज बेर्डेने पाचवा क्रमांक पटकावला. मुलींच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या सई प्रभुदेसाई हिने ५ गुण मिळवीत विजेतेपद तर गुहागरच्या पद्मश्री वैद्य हिने ४.५ गुणांसह उपविजेतेपद प्राप्त केले. ओवी गडाळे, आर्या करकरे व खुशी सावंत या तिघींनी अनुक्रमे तिसरे ते पाचवे स्थान प्राप्त केले. विजेत्या खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसे, चषक व सर्टिफिकेट्स देऊन गौरविण्यात आले. खुल्या व मुलींच्या स्पर्धेतील प्रथम दोन क्रमांक पटकवणाऱ्या खेळाडूंची राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यास निवड करण्यात आली. रत्नागिरी चेस अकॅडमीद्वारे या स्पर्धा आयोजित केल्या. बक्षीस वितरण बुद्धिबळ खेळाडू व प्रशिक्षक प्रवीण सावर्डेकर, रश्मी सावर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा आयोजन व पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांनी काम पाहिले.
-----------

rat१९p२६.jpg
51217
रत्नागिरी : सेवा सामाजिक विकास संस्था आणि अधोरेखित संस्था आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी आणि मार्गदर्शक.
-------------
सेवा सामाजिक विकास संस्था
रत्नागिरी : जयस्तंभ येथील शिर्के प्लाझा येथील सेवा सामाजिक विकास संस्था आणि अधोरेखित संस्थेच्या संयुक्त विद्यमाने करियर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यात देवरूख येथील आसपासच्या ग्रामीण भागातून वीस ते पंचवीस विद्यार्थी सहभागी झाले होते. सेवा सामाजिक संस्थेचे केंद्रप्रमुख सुहास बेर्डे यांनी अधोरेखित संस्थेचे शरद बाराथे, अध्यक्ष रेश्मा गोसावी, विजय गोसावी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना सेवा सामाजिक विकास संस्थेचे वाचनालय, अभ्यासिका, वर्ग, कार्यालय आदींची माहिती देण्यात आली. दोन सत्रात घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत पहिले सत्र सुहास बेर्डे यांनी घेतले. या वेळी काही बौद्धिक खेळ घेण्यात आले. त्यानंतर संस्थेमध्ये चालणारे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स उदाहरणार्थ नर्सिंग, पार्लर, हॉस्पिटल, व्हिजन असिस्टंट कशा पद्धतीने राबविले जातात, पात्रता काय आहे त्याला प्लेसमेंट कुठे मिळतात, याची सखोल माहिती बेर्डे यांनी पीपीटीद्वारे दिली. बार्टीचे आयबीपीएस व पोलीस प्रशिक्षण याचे संस्थेमध्ये होणारे कार्यक्रम व प्रशिक्षण याचीही माहिती पहिल्या सत्रामध्ये दिली गेली. दुसऱ्या सत्रामध्ये प्रशांत ठाकूर यांनी शासनामार्फत होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची भरती प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम, पात्रता, वेतन याची माहिती दिली. सीए, सायन्स, इंजिनियरिंग, एलएलबी, एमसीए इत्यादी करियर गायडन्सची माहिती दिली. सेवा सामाजिक विकास संस्थेमार्फत अधोरेखित संस्थेला भारतीय राज्यघटनेची एक प्रत भेट म्हणून दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97725 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..