दाभोळ-दीड हजार रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर 21 ला बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-दीड हजार रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर 21 ला बैठक
दाभोळ-दीड हजार रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर 21 ला बैठक

दाभोळ-दीड हजार रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर 21 ला बैठक

sakal_logo
By

रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या
प्रश्नावर २१ ला बैठक
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १९ : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कित्येक वर्षापासून रोजंदारी स्वरूपात काम करणाऱ्या सुमारे दीड हजार मजुरांचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात २१ सप्टेंबरला कृषीमंत्री यांनी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांचा नियमित होण्याचा अप्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या स्थापनेपासून ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. यातील कित्येक कामगारांची वीस वर्षापेक्षा अधिक सेवा झालेली आहे. यातील अनेकजण आता निवृत्तीकडे झुकलेले आहेत. काहीजण निवृत्तीच्या वाटेवर आहेत. या कर्मचाऱ्यांनी त्यांना सेवेत सामावून घ्यावे याकरिता अनेक आंदोलने, उपोषणे केली. मात्र त्यांचा प्रश्न अद्याप भिजत पडलेला आहे. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यावर आमदार योगेश कदम यांनी यात लक्ष घातल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी २१ सप्टेंबरला दुपारी १.३० वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत काय होते याकडे रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97740 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..