रेडेटाका-वरेरी रस्त्यासाठी सव्वाचार कोटीचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडेटाका-वरेरी रस्त्यासाठी
सव्वाचार कोटीचा निधी
रेडेटाका-वरेरी रस्त्यासाठी सव्वाचार कोटीचा निधी

रेडेटाका-वरेरी रस्त्यासाठी सव्वाचार कोटीचा निधी

sakal_logo
By

रेडेटाका-वरेरी रस्त्यासाठी
सव्वाचार कोटीचा निधी
देवगड, ता. १९ ः सरपंच आणि ग्रामस्थांच्या उपोषणामुळे तालुक्यातील रेडेटाका ते वरेरी रस्त्याच्या नूतनीकरण कामासाठी सुमारे ४ कोटी २० लाखाचा निधी मंजूर झाला, अशी माहिती पावणाई सरपंच पप्पू लाड यांनी दिली.
याबाबत लाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रेडेटाका, बापर्डे, वानिवडे, पावणाई, रहाटेश्‍वर, तळवडे, तळेबाजार, वरेरी हा रस्ता गेली कित्येक वर्षे नादुरुस्त होता. याबाबत संबंधित विभागाकडे रस्त्याच्या नूतनीकरणासाठी पावणाई सरपंच लाड यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. त्यावर ठोस कार्यवाही न झाल्यामुळे ११ डिसेंबर २०२१ ला याच रस्त्यावर बापर्डे, वानिवडे, पावणाई, रहाटेश्‍वर, गढीताम्हणे या पाच गावांच्या सरपंचांनी लाड यांच्या नेतृत्वाखाली उपोषण केले होते. या उपोषणाची आमदार नीतेश राणे यांनी दखल घेऊन संबंधित विभागाला सूचना आणि पत्रव्यवहार करून ताबडतोब मंजुरीसाठी पाठविण्यास सांगितले होते. त्यानुसार पुरवणी अर्थसंकल्प २०२१-२२ अंतर्गत या रस्त्याला सुमारे ४ कोटी २० लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे सरपंच आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आमदार राणे यांचे आभार मानले. सरपंच आणि ग्रामस्थांच्या उपोषणामुळे रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97754 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..