स्वप्नाली सावंत खून, संशयितांच्या कोठडीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वप्नाली सावंत खून, संशयितांच्या कोठडीत वाढ
स्वप्नाली सावंत खून, संशयितांच्या कोठडीत वाढ

स्वप्नाली सावंत खून, संशयितांच्या कोठडीत वाढ

sakal_logo
By

स्वप्नाली खून प्रकणातील
संशयितांच्या कोठडीत वाढ
दुसऱ्या मोबाईलचा शोध ; अजून तपास सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ः शहरानजीकच्या सडामिऱ्या येथील माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंतचा खून प्रकरणातील तीन संशयितांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने तीन दिवसांची वाढ केली. या गुन्ह्यात स्वप्नालीचा मुळ मोबाईल आणि तिचे लोकेशन लांजा येथे दाखवण्यात आलेला दुसरा मोबाईल, असे दोन्ही मोबाईल अजूनही हस्तगत करण्यात आले नसल्याची बाजू सरकारी पक्षातर्फे मांडण्यात आली. आरोपींच्या वकीलांनी पोलिस कोठडी न मिळण्याच्यादृष्टीने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. १ सप्टेंबरला सकाळी गळा आवळून तिचा खून केल्याची कबुली संशयित आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी सांगितले. स्वप्नाली सावंतचा पती संशयित सुकांत गजानन सावंत (४७, रा. सडामिऱ्या चौसोपीवाडी, रत्नागिरी), रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (४३, रा. सडामिऱ्या मधलावठार, रत्नागिरी) आणि प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग (३३, मुळ रा. विसापूर कारुळ, गुहागर, सध्या रा. मिऱ्याबंदर,रत्नागिरी) अशी खून करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. आज त्यांची पोलिस कोठडी संपली. त्यांना न्यायालयात हजर करण्याचा आले. यावेळी संशयित आरोपींच्या वकिलांनी संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात येऊ नये अशी मागणी केली. पोलिसांनी या नऊ दिवसांमध्ये स्वप्नालीची हाडे, राख, वाहने, संशयितांचे मोबाईल आदी पुरावे गोळा केलेले आहेत. त्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले आहेत. रोज पोलिसांची टिम गुन्ह्याच्या ठिकाणी जात असल्याने तपास शिल्‍लक राहिला नसल्याचे सांगितले. तसेच पोलिस स्वप्नालीचा पती सुकांत याला ११ तारखेला अटक करण्यापूर्वी ५ ते ७ सप्टेंबरपर्यंत सातत्याने चौकशीसाठी पोलिसात बोलावत होते. मात्र सरकारी पक्षातर्फे खून झालेल्या स्वप्नाली सावंतचा मुळ मोबाईल अजूनही पोलिसांना मिळालेला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97762 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..