चव्हाणांच्या प्रतिकृती राज्यस्तरावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चव्हाणांच्या प्रतिकृती राज्यस्तरावर
चव्हाणांच्या प्रतिकृती राज्यस्तरावर

चव्हाणांच्या प्रतिकृती राज्यस्तरावर

sakal_logo
By

51261 (फोटो हाप कॉल वापरा)
सूर्यकांत चव्हाण

चव्हाणांच्या प्रतिकृती राज्यस्तरावर
बांदा ः बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल आणि डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रयोगशाळा सहायक सूर्यकांत चव्हाण यांच्या प्रतिकृतीची सलग चौथ्यावेळी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. तालुका आणि जिल्हास्तरावर आयोजित विज्ञान प्रदर्शनात प्रयोगशाळा सहायक आणि परिचर गटातून प्रथम क्रमांक मिळविल्याने त्यांना राज्यस्तरावर संधी मिळाली. उपक्रमशील चव्हाण यांनी यापूर्वी आपत्कालीन सूचना देणारे यंत्र, मानवी इंद्रियांची रचना व कार्य, ‘अवयवदान श्रेष्ठ दान’ यांसारख्या विषयांवर प्रतिकृती सादर केल्या होत्या. यावर्षी ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ विषयांतर्गत गणितीय मॉडेलिंग सादर केले. राज्यस्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात आता प्रतिकृती ते सादर करणार आहेत. आपल्या यशाबद्दल बोलताना शिक्षणमहर्षी (कै.) आबासाहेब तोरसकर यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचे समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. चव्हाण यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापिका माधवी सावंत, पर्यवेक्षक नंदू नाईक आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97767 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..