शासकीय कर्मचाऱ्यांची आज सिंधुदुर्गनगरीत दुचाकी रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कर्मचाऱ्यांची आज
सिंधुदुर्गनगरीत दुचाकी रॅली
शासकीय कर्मचाऱ्यांची आज सिंधुदुर्गनगरीत दुचाकी रॅली

शासकीय कर्मचाऱ्यांची आज सिंधुदुर्गनगरीत दुचाकी रॅली

sakal_logo
By

शासकीय कर्मचाऱ्यांची आज
सिंधुदुर्गनगरीत दुचाकी रॅली
सिंधुदुर्गनागरी, ता. १९ ः राज्य शासकीय, निमशासकीय शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या (ता. २१) जिजामाता चौक, ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.
जिल्हा शाखेची सभा आज सिंधुदुर्गनगरी येथे संघटना कार्यालयात झाली. तीमध्ये दुचाकी रॅलीबाबत विचारविनिमय करण्यात आला. त्‍यानुसार सकाळी अकराला रॅली आयोजित केली आहे. ही रॅली नवीन अंशदायी पेन्‍शन योजना रद्द करून जुनी पेन्‍शन योजना लागू करावी, शासकीय नोकऱ्यांतील कंत्राटी भरती बंद करून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्‍यावे, सातव्‍या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत बक्षी समितीच्‍या खंड-२ मधील शिफारशी तत्‍काळ लागू करणे, या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केली आहे. यामध्‍ये सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन राज्‍य सरकारी कर्मचारी समन्‍वय समितीने केले आहे. यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना कार्याध्यक्ष सत्यवान माळवे, महसूल कर्मचारी संघटनेचे राजन वालावलकर, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना सरचिटणीस एस. एल. सपकाळ, संजय पवार, सुनील खांदारे, राजेश चव्‍हाण, श्रीराम चव्‍हाण, सचिन मदने, संदीप गवस यांच्यासह ग्रामसेवक संघटना सिंधुदुर्ग व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख सभा, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन महाराष्ट्र, राज्य वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97769 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..