देवरूख नगरपंचायत व्यायामशाळेची फी अचानक वाढवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख नगरपंचायत व्यायामशाळेची फी अचानक वाढवली
देवरूख नगरपंचायत व्यायामशाळेची फी अचानक वाढवली

देवरूख नगरपंचायत व्यायामशाळेची फी अचानक वाढवली

sakal_logo
By

देवरूख नगरपंचायत व्यायामशाळेच्या शुल्कात वाढ
साडवली, ता. १९ : देवरूख नगरपंचातीच्या व्यायामशाळेत व्यायाम करण्यासाठी लागणाऱ्या शुल्कात वाढ करण्यात आले आहे. यामुळे अनेक विद्यार्थी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. हाच मुद्दा घेत शिवसेना नगरसेवकांच्या वतीने मुख्याधिकारी चेतन विसपुते यांना निवेदन देण्यात आले आहे.
नगरपंचायतीने वाढवलेले शुल्क मागे घ्यावे आणि असलेल्या सुविधा सर्वांना उपलब्ध करून द्यावा, इलेक्ट्रॉनिक मशीन केवळ महिलांना वापरायला दिले आहे, त्याचा सर्वांना करू द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावर मुख्याधिकारी यांनी तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन सादर करतेवेळी नगरसेवक बाबू मोरे ,वैभव पवार, इस्तियाक कापडी, युवा सेना तालुका अधिकारी मुन्ना थरवळ आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97775 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..