‘पार्थ’च्या दुर्घटनास्थळाची आज पाहणी ः तोरसकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पार्थ’च्या दुर्घटनास्थळाची 
आज पाहणी ः तोरसकर
‘पार्थ’च्या दुर्घटनास्थळाची आज पाहणी ः तोरसकर

‘पार्थ’च्या दुर्घटनास्थळाची आज पाहणी ः तोरसकर

sakal_logo
By

‘पार्थ’च्या दुर्घटनास्थळाची
आज पाहणी ः तोरसकर

मालवण, ता. १९ ः विजयदुर्ग ते देवगड दरम्यानच्या खोल समुद्रात दुर्घटनाग्रस्त बनलेल्या ‘पार्थ’ या तेलवाहू जहाजासंदर्भात सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी उद्या (ता. २१) मच्छीमार संघटना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून पाहणी करणार आहेत. येथील पर्यटनाला, मासेमारीला बाधा पोहोचू नये, यासाठी ही पाहणी केली जाणार आहे. या पाहणीनंतर सादर केलेल्या वस्तुस्थितीदर्शक अहवालाची प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी श्रमिक मच्छीमार संघाचे रविकिरण तोरसकर यांनी केली आहे.
तोरसकर म्हणाले, ‘‘दुर्घटनाग्रस्त तेलवाहू जहाजासंदर्भात सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील मच्छीमार संघटना प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करणार आहे. यामध्ये खोल समुद्रातील स्कुबा डायव्हिंगबरोबरच जीपीएस यंत्रणा त्याचबरोबर ड्रोन टेक्नॉलॉजीसारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर संघटना करणार आहेत. सिंधुदुर्गातील सागरी जैवविविधता अतिशय संवेदनशील असून भविष्यात कोणत्याही प्रकारचा तेल अथवा तत्सम सदृश तवंग पसरल्यास किंवा अन्य परिस्थिती निर्माण झाल्यास मासेमारी, तसेच जिल्ह्यातील मासेमारीसह पर्यटनालाही बाधा येऊ शकते. या जहाजातील डांबरसदृश पदार्थ अथवा डिझेल यांचा भविष्यातील लिकेजचा परिणाम सागरी जीवसृष्टीवर होऊ नये, यासाठी स्वखर्चाने या दुर्घटनेबाबत जिल्ह्यातील मच्छीमार माहिती घेणार आहेत. या पाहणीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल प्रशासनासमोर ठेवणार आहेत.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97777 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..