कोकणकन्या एक्‍स्प्रेस आता ‘सुपरफास्ट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणकन्या एक्‍स्प्रेस 
आता ‘सुपरफास्ट’
कोकणकन्या एक्‍स्प्रेस आता ‘सुपरफास्ट’

कोकणकन्या एक्‍स्प्रेस आता ‘सुपरफास्ट’

sakal_logo
By

कोकणकन्या एक्‍स्प्रेस
आता ‘सुपरफास्ट’
वेग वाढणार; गाडीच्या क्रमांकातही बदल

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १९ ः कोकणवासीयांसाठी हक्‍काच्या असणाऱ्या आणि या मार्गावर सर्वाधिक लोकप्रिय कोकणकन्या एक्‍स्प्रेस या गाडीचा वेग आता वाढणार आहे. एक्‍स्प्रेसमधून सुपरफास्ट श्रेणीत या गाडीला बढती देण्यात आली आहे. कोकणकन्या सुपरफास्टचे नवे वेळापत्रक २० जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहे. गाडीचा क्रमांकही बदलण्यात आला आहे. दरम्यान, ही गाडी उद्यापासून (ता. २०) विजेवरील इंजिनासह धावणार आहे. यात गतीही वाढणार आहे. त्‍यामुळे प्रवाशांचा एक तास वाचणार आहे. ही माहिती आज कोकण रेल्‍वेकडून देण्यात आली.
मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्‍शन या दरम्‍यान १०११२/१०१११ या क्रमांकाने कोकणकन्या एक्‍स्प्रेस धावत आहे. आता २० जानेवारीपासून कोकणकन्या सुपरफास्ट एक्‍स्प्रेस २०११२/२०१११ या क्रमांकाने दररोज धावणार आहे.
२० जानेवारीपासून लागू होणारे नवे वेळापत्रक ः मडगाव ते मुंबई सीएसएमटी (२०११२) : मडगाव-सायं.७.००, करमळी ७.४२, थिवीम ९.००, पेडणे ८.१२, सावंतवाडी ८.३६, कुडाळ ८.५८, सिंधुदुर्ग ९.१२, कणकवली ९.२८, वैभववाडी ९.५४, रत्‍नागिरी ११.१५, चिपळूण मध्यरात्री १२.३०, पनवेल पहाटे ३.५५, ठाणे ४.४२, दादर ५.१२, सीएसटीएम ५.४०. सीएसटीएम ते मडगाव (२०१११) : सीएसएमटी रात्री ११.०५, दादर ११.१७, ठाणे ११.४५, पनवेल मध्यरात्री १२.२५, चिपळूण पहाटे ३.३०, रत्‍नागिरी ४.४५, वैभववाडी ६.१०, कणकवली ६.४२, सिंधुदुर्ग ७.००, कुडाळ ७.१२, सावंतवाडी ७.३२, पेडणे ७.५६, थिवीम ८.१०, करमळी ८.३२ आणि मडगाव ९.४६.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97786 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..