तळवणे मारहाणप्रकरणी सात जणांना सशर्त जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळवणे मारहाणप्रकरणी
सात जणांना सशर्त जामीन
तळवणे मारहाणप्रकरणी सात जणांना सशर्त जामीन

तळवणे मारहाणप्रकरणी सात जणांना सशर्त जामीन

sakal_logo
By

तळवणे मारहाणप्रकरणी
सात जणांना सशर्त जामीन
सावंतवाडी, ता. १९ ः पायवाटेच्या वादावरून तळवणे-टेंबवाडी येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीतील सात संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांची प्रत्येकी १५ हजाराच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. हा प्रकार ९ सप्टेंबरला घडला होता. याप्रकरणी यशवंत तुकाराम गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित सात जणांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी संशयितांच्या बाजूने अॅड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले. अधिक माहिती अशी की, यशवंत गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राकेश अशोक गावडे, अशोक रामचंद्र गावडे, राजेश गावडे, रामचंद्र उर्फ रंजा गावडे, रिकीता गावडे, मयुरी गावडे व भाग्यरेषा गावडे या सात जणांविरोधात गर्दी करुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आज त्यांना अटक करून येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी त्यांची प्रत्येकी १५ हजाराच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली. राकेश अशोक गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तुकाराम गावडे, आत्माराम गावडे, अंजली गावडे, यशवंत गावडे या चौघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97796 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..