वीज वाहिनी स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्‍यू वीज वाहिन्यांच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्‍यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज वाहिनी स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्‍यू
वीज वाहिन्यांच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्‍यू
वीज वाहिनी स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्‍यू वीज वाहिन्यांच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्‍यू

वीज वाहिनी स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्‍यू वीज वाहिन्यांच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्‍यू

sakal_logo
By

51292
सत्‍यवान सावंत


वीज वाहिनी स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्‍यू

भिरवंडेतील घटना; महावितरणविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १९ ः तुटलेल्‍या विद्युतभारित वीज वाहिनीला स्पर्श झाल्‍याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्‍यू झाला. भिरवंडे गावातील जांभुळभाटले येथे आज ही घटना घडली. सत्‍यवान नारायण सावंत (वय ७८) असे मृताचे नाव आहे. सावंत यांच्या घरापासून काही अंतरावरच सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
महावितरणच्या हयगयीमुळे ही घटना घडल्‍याचा आरोप करत भिरवंडे ग्रामस्थांनी महावितरण विरोधात आंदोलन केले. मृताच्या कुटुंबियांना भरपाई मिळाल्‍याखेरीज मृतदेह ताब्‍यात न घेण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी घेतला होता. महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दोन महिन्यांच्या आत भरपाई देण्याचे आश्‍वासन दिल्‍याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
भिरवंडे-जांभुळभाटले येथील रहिवासी सत्‍यवान सावंत हे आज सकाळी सातच्या सुमारास घरापासून काही अंतरावर गुरे चारण्यासाठी गेले होते. त्‍यावेळी वाटेवरच तुटलेली विद्युतभारित वाहिनी त्यांच्या लक्षात आली नाही. पुढे गेलेल्‍या गुरांनाही विजेचा धक्‍का बसला होता. यात गुरे उधळली आणि पुढे गेली. तर विजेचा धक्‍का बसून सावंत तेथेच कोसळले. काही वेळाने हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आला. त्‍यानंतर तातडीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून भिरवंडे-जांभुळभाटले येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. महावितरण आणि पोलिस प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आली. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, माजी सरपंच मंगेश सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, भिरवंडे सरपंच सुजाता सावंत, उपसरपंच नितीन सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. याखेरीज पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, उपकार्यकारी अभियंता विलास बगाडे, सहायक अभियंता थोरबोले हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
मृताच्या कुटुंबियांना महावितरणकडून नुकसान भरपाई मिळत नाही, तोवर मृतदेह न उचलण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. या प्रकरणाबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल. तसेच आवश्‍यक कागदपत्रे मिळाल्‍यानंतर दोन महिन्यांत नुकसान भरपाई देऊ, अशी ग्‍वाही मोहिते यांनी दिली.
------------
चौकट
बेजाबबदार महावितरण
भिरवंडे गावात एक वर्षापूर्वी भिकाजी कोकरे यांचाही तुटलेल्‍या वीज तारेला स्पर्श होऊन मृत्‍यू झाला होता; मात्र त्‍यांच्या कुटुंबियांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नसल्‍याची बाब ग्रामस्थांनी अभियंता मोहिते यांच्या निदर्शनास आणून देत आणि महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्‍त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97806 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..