तिरोडकर महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरोडकर महाविद्यालयात 
अभियंता दिन उत्साहात
तिरोडकर महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात

तिरोडकर महाविद्यालयात अभियंता दिन उत्साहात

sakal_logo
By

५१३३६
पणदूर ः तिरोडकर महाविद्यालयात कार्यक्रमाचे उद्‍घाटन करताना मान्यवर.

तिरोडकर महाविद्यालयात
अभियंता दिन उत्साहात
कुडाळ ः वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा या प्रशालेत भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक एम. जी. कर्पे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता घनःश्याम शिरसेकर (कुडाळ) यांच्यासह संस्थेचे उपकार्याध्यक्ष प्रकाश जैतापकर आदी उपस्थित होते. बारावीचा विद्यार्थी हर्षद परब याने डॉ. विश्वेश्वरैय्या यांचा जीवनपट आपल्या भाषणातून सादर केला. शिरसेकर यांनी डॉ. विश्वेश्वरैय्या यांच्या अतिसूक्ष्म निरीक्षणशक्तीचे उदाहरण देऊन त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. संस्थेचे संचालक व माजी मुख्याध्यापक सुधाकर वळंजू यांनी चांगले जीवन जगण्यासाठी कला व शास्त्र यांची सांगड घालावी. त्यामुळे सुंदर जीवन जगता येते, असे प्रतिपादन केले. संस्था सचिव आपा गावडे उपस्थित होते. संचालक व पर्यवेक्षक श्री.पाटील यांनी आभार मानले.
................
५१३३७
कुडाळ ः उद्यमनगर नाका रंब्लिंग स्ट्रीप मारताना कर्मचारी.

उद्यमनगर नाक्यावर रंब्लिंग स्ट्रीप
कुडाळ ः वाढत्या अपघाताच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून उद्यमनगर नाका येथे रंब्लिंग स्ट्रीप मारण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या महामार्ग पाहणी दौऱ्यात उद्यमनगर नाका येथे ठेकेदार कंपनीने वारंवार सांगूनही उपाय योजना केल्या नसल्याचे कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्याप्रमाणे मंत्री चव्हाण यांनी उपाय योजना करण्यासंबंधी सूचना केल्या होत्या; मात्र पाऊस व इतर कारणे देऊन ठेकेदार टाळाटाळ करत होता. त्यामुळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य नीलेश तेंडुलकर यांनी कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला यश येऊन ठेकेदार कंपनीने बेंगलोर येथून यंत्रणा मागवून उद्यमनगर नाका येथे रंब्लिंग स्ट्रीप मारल्या. गतवर्षी याच ठिकाणी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच अनेक अपघातही झाले होते. त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटून तहसीलदार कार्यालयात महामार्ग अधिकारी व ठेकेदाराला नागरिकांनी धारेवर धरले होते.
--
५१४३२
दोडामार्ग ः येथील केंद्रशाळेत वह्या वाटप करताना भाजयुमोचे पदाधिकारी.

भाजयुमोतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
दोडामार्ग : भाजपचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना भाजप युवा मोर्चाच्यावतीने वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दीपक गवस, कोनाळ सरपंच पराशर सावंत, युवा मोर्चा कार्यकर्ते स्वप्नील गवस, साजन गवस, विनायक खडपकर, सुमित म्हाडगूत, सर्वेश गवस, लक्ष्मण खडपकर, शुभम मुळगावकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक जयसिंग गावित व शिक्षक उपस्थित होते.
---------------
गोवा राज्यातून अनिकेत प्रथम
दोडामार्ग ः साटेली-भेडशी, दोडामार्ग बाजारपेठेत व इतर ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून वाहनांवरील सामान उतरविणे-चढविण्याचे काम करणार्‍या भेडशी येथील नरेश पार्सेकर या कष्टकर्‍याचा मुलगा अनिकेत पार्सेकर याने गोवा आयटीआयमधून डिझेल मेकॅनिकमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. डिचोली-गोवा येथे नुकतेच त्याला मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दोडामार्ग तालुका चर्मकार समाज बांधवांच्यावतीनेही अनिकेत पार्सेकर यांचा गौरव करण्यात आला. परिस्थिती हलाखीची असूनही वडिलांनी हमाली करून मुलाला शिक्षण दिले. डिचोली-गोवा येथील आयटीआयमध्ये डिझेल मेकॅनिक या शाखेत सतत मेहनत घेऊन अनिकेत हा गोवा राज्यात प्रथम आला आहे. अनिकेतने मिळविलेले हे यश अन्य विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे.
------------------
गोवेरी येथे भजन स्पर्धा
कुडाळ ः गोवेरी येथील वसंत गावडे बुवा स्मृती जिल्हास्तरीय भजन स्पर्धा सत्पुरुष मंदिर येथे १ ते ४ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. गोवेरी येथील श्री सत्पुरुष कला क्रीडा मंडळ, ज्ञानदीप वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय व देवस्थान कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे ५००१, ३५००, २५०० रुपये तसेच उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकांना प्रत्येकी १००० रुपये, सर्व विजेत्यांना प्रत्येकी चषक देण्यात येईल. उत्कृष्ट गायक, हार्मोनियम, पखवाज, कोरस व झांजवादक यांना प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक मंडळांनी नाव नोंदणीसाठी सतीश गावडे, केशव गावडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री सतपुरुष कला क्रीडा मंडळ, ज्ञानदीप वाचनालय व देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
------------------
‘राष्ट्रवादी काँग्रेस दळवींच्या पाठीशी’
वेंगुर्ले ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना कार्यालयात जाऊन मारहाण करणे हे निंदनीय आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने मारहाण करणे ही सिंधुदुर्गची संस्कृती नाही. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे दळवी यांच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी दिली. गावडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पोलिसांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आहे. पोलिस खाते सखोल चौकशी करून योग्य न्याय देतील, हा आमचा ठाम विश्वास आहे. दळवींना पोलिस खात्याकडून न्याय न मिळाल्यास पक्षाला गांभीर्याने दखल घ्यावी लागेल, असेही एम. के. गावडे म्हणाले.
.............
कोनाळमध्ये प्रवासी शेड
दोडामार्ग ः कोनाळ येथील प्रवासी शेडचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या हस्ते नारळ वाढवून व राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले. कसई-दोडामार्ग माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष नानचे, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, रमेश दळवी, चंदू मळीक, संदेश वरक, संजय विर्नोडकर, भाजप शक्तिकेंद्र प्रमुख प्रशांत गवस, कोनाळ ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे, ग्रामसेवक जे. बी. खानोलकर, सुदन चोर्लेकर, माजी सैनिक मधुकर लोंढे, महादेव लोंढे, विश्राम लोंढे, आत्माराम लोंढे, बाळा लोंढे, सूर्याजी लोंढे, उदय गवस, लक्ष्मण लोंढे, राजन लोंढे, शुभम लोंढे, दत्ताराम नाईक, लुशांत फर्नांडिस, मंगेश पाटील, गजानन लोंढे, विलास नाईक, संतोष काळकुद्रीकर, शंकर लोंढे, स्वप्नील लोंढे, सहदेव नाईक, प्रसन्ना पांगम आदी ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
------------------
ट्रक चालकांचा ओसरगावात सत्कार
कणकवली ः जागतिक चालक दिन तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओसरगाव टोल नाक्याजवळ रस्ते वाहतूक महामार्ग पोलिस, ट्रॅफिक पोलिस तसेच ओसरगाव ग्रामस्थांच्यावतीने देशभरातल्या ट्रक चालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पाणी व बिस्किटाचे वाटप करण्यात आले. रस्ते वाहतूक सहायक पोलिस निरीक्षक अरुण जाधव, रामचंद्र गोसावी, ओसरगावचे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे, पोलिस कर्मचारी, ट्रॅफिक पोलिस, महामार्ग पोलिस, ट्रक चालक व ग्रामस्थ उपस्थित होते. अरुण जाधव यांनी ट्रक चालकांना सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन केले.
------------------
माजी सैनिक पतसंस्थेची सभा
दोडामार्ग : येथील माजी सैनिक सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. २४) होणार आहे. सभा सकाळी साडेदहा वाजता येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित केली आहे. सभासदांच्या गुणवंत मुलांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. संबंधित सभासदांनी आपल्या मुलांच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स गुरुवारपूर्वी (ता. २२) संस्थेत जमा करावयाची आहे. सर्व सभासदांनी वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष रमेश दळवी व व्यवस्थापक प्रदीप गवस यांनी केले आहे.
---
कोळंब किनारी स्वच्छता मोहीम
मालवण ः कोळंब येथील सोमवती समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सरपंच प्रतिमा भोजने, उल्हास मेथर, विनायक धुरी, भाऊ फणसेकर, शैलेश प्रभुगावकर, अवी कोळंबकर, प्रदीप भोजने, मानसिंग लाटकर, जोशी, रत्नाकर कोळंबकर, मंदार माईणकर, संदीप मेथर, बापू लोके, संजय आरोंदेकर, सुधा लाड, प्रसाद डिचोलकर, सागर सारंग, प्रकाश परब, चेतन भोजने सहभागी झाले होते.
--
कुडाळात नवरात्रोत्सवाचे आयोजन
कुडाळ ः श्री देवी केळबाई उत्सव मंडळ, कुडाळच्यावतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन श्री देवी केळबाई मंदिर येथे सोमवारी (ता.२६) ते बुधवारी (ता. ५) ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97882 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..