हिंदी वक्तृत्व स्पर्धेत आर्या प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदी वक्तृत्व स्पर्धेत आर्या प्रथम
हिंदी वक्तृत्व स्पर्धेत आर्या प्रथम

हिंदी वक्तृत्व स्पर्धेत आर्या प्रथम

sakal_logo
By

51338
सरंबळ ः आर्या होळकर यांचे अभिनंदन करताना अनिल परब. सोबत विवेकानंद बालम, श्री. साटम, श्री. होळकर.

हिंदी वक्तृत्व स्पर्धेत आर्या प्रथम
कुडाळ ः जिल्हा ग्रंथालय कुडाळ यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धेत सरंबळ इंग्लिश स्कूल, प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका आर्या होळकर यांनी खुल्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. या स्पर्धेत त्यांनी विश्वभाषा की ओर हिंदी'' या विषयावर वक्तृत्व सादर केले. यापूर्वीही या स्पर्धेत सलग दोन वेळा प्रथम क्रमांक केलेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सरबळ ग्रामस्थ समता संघ, मुंबईचे अध्यक्ष रामचंद्र राऊत, सेक्रेटरी राजेंद्र परब, खजिनदार अनिल परब, शाळेचे मुख्याध्यापक विवेकानंद बालम, शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे, शाखा चिटणीस प्रसाद साटम तसेच संस्थेचे इतर मान्यवर यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97883 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..