स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवा
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवा

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवा

sakal_logo
By

51341
कुडाळ ः स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करताना सत्यवान रेडकर. सोबत अरुण मर्गज, परेश धावडे, शुभांगी लोकरे, डॉ. प्रगती शेटकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)


स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवा

सत्यवान रेडकर ः कुडाळमध्ये कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः यशस्वी व्हायचे असेल, तर सबबी सांगून पळवटा काढू नका. संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा. मेहनतीने यूपीएससी, आयपीएस, आयएएस, एमपीएससीसारख्या परीक्षा उत्तीर्ण होऊन ध्येय गाठा, असे प्रतिपादन ‘तिमिरातून तेजाकडे’ चे संस्थापक अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी केले.
येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संदर्भात आयोजित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सामान्य ज्ञानासाठी नियमित वर्तमानपत्र वाचणे, टीव्हीवरील बातम्या ऐकणे याचे महत्त्व विशद केले. बुद्धिमत्ता चाचणीसाठी कशी तयारी करावी, गणिती समीकरणे, बैजिक गणिते कशी सोडवावीत, इंग्रजी, मराठी व्याकरणासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, या संदर्भातील मार्गदर्शन केले. शिक्षणातील झपाटलेपणा आणि ज्ञानप्राप्तीची आस उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाऊ शकते, असे ते म्हणाले. सिंधुदुर्गातील मुले स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शाळांमध्ये जाऊन ते निःशुल्क मार्गदर्शन करतात. ते सावंतवाडी तालुक्यातील कवठणी-बोरभाटवाडी येथील असून मुंबई येथील सीमा शुल्क विभागात ज्युनियर ट्रान्सलेटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल शिक्षण संस्थेच्या करिअर गायडन्स विभागाच्यावतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व बॅ. नाथ पै यांच्या चरित्रावर आधारित पुस्तक भेट देऊन त्यांना गौरविण्यात आले. संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यक्रम समन्वयक प्रा. अरुण मर्गज यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा झाली. मुंबई स्थित संतोष परब, नीलेश तेरसे व संस्थेतील विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य, प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. प्रा. अरुण मर्गज यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97884 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..