नाग्या महादू वसतीगृहास भाजपतर्फे वस्तूंचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाग्या महादू वसतीगृहास
भाजपतर्फे वस्तूंचे वाटप
नाग्या महादू वसतीगृहास भाजपतर्फे वस्तूंचे वाटप

नाग्या महादू वसतीगृहास भाजपतर्फे वस्तूंचे वाटप

sakal_logo
By

L51340
नारूर ः येथील कातकरी समाजाच्या मुलांना मदतीचे वाटप करताना भाजपचे पदाधिकारी.

नाग्या महादू वसतीगृहास
भाजपतर्फे वस्तूंचे वाटप
कुडाळ ः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवसानिमित्त सेवा सप्ताह राबवला जात आहे. यानिमित्ताने तालुक्यातील शोषित मुक्ति अभियान संस्थेच्या वेताळबांबर्डे येथील नाग्या महादू निवासी वसतीगृहातील नारूर येथील कातकरी समाजाच्या मुलांना मोफत दप्तरे, शालेय साहित्य, खाऊ, लाडू, मिठाई, जीवनावश्यक वस्तूंचे सिंधुदुर्ग भाजपच्यावतीने व विशाल परब यांच्या सहकार्यातून वाटप करण्यात आले. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, आनंद परब, विकास परब, आनंद साटम, साई भोई, तेजस माने, किसान मोर्चाचे नेते नाईक, कातकरी समाजाचे नेते उदय आईर तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री. परब म्हणाले, ‘‘मी माझ्या कातकरी बांधवांना कधीही वाऱ्यावर सोडू देणार नाही. त्यांच्यासाठी जे काय करता येईल ते सातत्याने करत राहीन. या कातकरी समाजाच्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला माझ्या वतीने मी जमेल तसे मदत करत राहील.’’
------------
पदांसाठी अर्जांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सावंतवाडी अंतर्गत माजगाव कासारवाडा, डिंगणे धनगरवाडी, चराटे तिलारी कॉलनी अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी इच्छुक व पात्र महिला उमेदवाराने २८ पर्यत कार्यालयीन वेळेत सायंकाळी ५ वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प सावंतवडी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहन सावंतवाडीचे एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी संध्या मोरे यांनी केले आहे. या जाहिरातीत नमुद केलेला शासन निर्णय राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97885 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..