गणित संबोध परीक्षेमध्ये आरपीडी हायस्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणित संबोध परीक्षेमध्ये
आरपीडी हायस्कूलचे यश
गणित संबोध परीक्षेमध्ये आरपीडी हायस्कूलचे यश

गणित संबोध परीक्षेमध्ये आरपीडी हायस्कूलचे यश

sakal_logo
By

गणित संबोध परीक्षेमध्ये
आरपीडी हायस्कूलचे यश
सावंतवाडी, ता. २० ः विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्यावतीने दरवर्षी पाचवी व आठवीसाठी गणित संबोध परीक्षा आयोजित केली जाते. यावर्षीही दरवर्षीप्रमाणे राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
५ वी व ८ वी मध्ये अनुक्रमे १२ व ३९ असे एकूण ५१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते आणि ५१ पैकी ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला. ५ वी तील दिप पित्रे (प्रथम), श्रावणी निचम व साईराज राऊळ (संयुक्तपणे द्वितीय), विराज नाईक (तृतीय) यांच्यासह सर्व १२ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली. ८ वी मधून ओजस मेस्त्री (प्रथम), काजल गावडे, दुर्वा नाईक व अथर्व बांदेकर (संयुक्तपणे द्वितीय) तसेच अभिजीत कुडव व अथर्व मालवणकर (संयुक्तपणे तृतीय) यांच्यासह १८ विद्यार्थ्यांनी प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली. ५ वीमधून १२ विद्यार्थी आणि ८ वीमधून ३९ असे सर्व विद्यार्थी गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकवृंद व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकासभाई सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक एस. पी. नाईक, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक व पर्यवेक्षक ए. व्ही. साळगांवकर यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97887 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..