प्रकाश साळवी यांना कला गौरव पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाश साळवी यांना कला गौरव पुरस्कार
प्रकाश साळवी यांना कला गौरव पुरस्कार

प्रकाश साळवी यांना कला गौरव पुरस्कार

sakal_logo
By

rat18p24.jpg-
51418
पुणे : कुंभार कला गौरव पुरस्कार स्वीकारताना प्रकाश साळवी व सुरेखा साळवी.
----------
प्रकाश साळवी यांना कला गौरव पुरस्कार
मंडणगड ः कोकणस्थ कुंभार समाज सेवा संस्था पुणे यांच्यावतीने मंडणगडचे मंडल अधिकारी प्रकाश साळवी यांना कुंभार कला गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे झालेल्या गौरव सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चिवेलीकर, महापौर मुरलीधर मोहळ, नगरसेवक रघुनाथ गौडा, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, शिवशाहीर गुरुराज कुंभार, गजानन बगावडे, दीपक निवळकर, संतोष साळवी, वैशाली अंबीरकर आदी उपस्थित होते. कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल प्रकाश साळवी व सुरेखा साळवी या दाम्पत्यांचा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. महसूल विभागात सेवेत असलेल्या प्रकाश साळवी यांना नुकतीच मंडल अधिकारी या पदावर बढती मिळालेली असल्याने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

-------
मोदींच्या वाढदिवसानिमित्त फळेवाटप
साडवली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशातील भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवा पंधरवडा आयोजित केला आहे. यात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय कार्यक्रमाची योजना अंमलात आणली जात आहे. भारताच्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी दूर करून त्यांना मदत करावी असे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. संगमेश्वर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून मोदी यांना शुभेच्छा देण्यासाठी संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांन फळवाटप केले. कार्यक्रमासाठी योगेश मुळ्ये, अनिल घोसाळकर, दीपक वेल्हाळ, अजिंक्य राज सुर्वे, दीपक कांबळे, गणेश पवार, संजय ऊर्फ बापू सुर्वे, स्वप्निल सुर्वे, संजोग आंबेरकर, निखिल लोध, सचिन कदम, लीलाधर आंबेरकर यांनी नियोजन केले.
-------
rat18p25.jpg-
51405
चिपळूण ः अनिल कलकुटकी यांचा विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
-----------
अनिल कलकुटकी यांचा गौरव
चिपळूण ः मुंबई विद्यापीठाच्या शिक्षकेत्तर आदर्श कर्मचारी पुरस्कार मिळालेल्या डीबीजे कॉलेजचे वरिष्ठ लिपिक अनिल कलकुटकी यांचा खेर्डीतील विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी मंडळाचे आधारस्तंभ दशरथ दाभोळकर, मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका दिशा दाभोळकर, ग्रामपंचायत सदस्य रियाझ खेरटकर, प्रणाली दाभोळकर, प्रशांत दाभोळकर, विकास ढवण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97942 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..