अपूर्ण प्रकल्पामुळे सिंचनाअभावी जमिनी ओसाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपूर्ण प्रकल्पामुळे सिंचनाअभावी जमिनी ओसाड
अपूर्ण प्रकल्पामुळे सिंचनाअभावी जमिनी ओसाड

अपूर्ण प्रकल्पामुळे सिंचनाअभावी जमिनी ओसाड

sakal_logo
By

rat19p31.jpg
51237
पाचलः अर्जुना मध्यम प्रकल्पातून वाहणारे पाणी.
-------
अपूर्ण प्रकल्पामुळे सिंचनक्षेत्र ओसाड
राजापूर तालुका; पूर्ण प्रकल्पाची कालव्यांची कामे रखडली
राजापूर, ता. २०ः तालुक्यामध्ये मोठ्यासंख्येने सिंचन प्रकल्प (धरणे) प्रस्तावित असून त्यापैकी काही धरणांची कामे पूर्ण झाली आहेत. काहीची अद्यापही अपूर्ण आहेत. पूर्ण झाल्या प्रकल्पांच्या कालव्यांची कामे रखडली असून त्यापैकी बहुतांश धरणामधील पाणी साठ्याचा उपयोग शेती वा पिण्याच्यादृष्टीने लोकांना होत नाही. या प्रस्तावित धरणांमुळे भविष्यात तालुक्याचे मोठ्याप्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली येणार असले तरी विविध कारणांमुळे रखडलेल्या प्रकल्पांमुळे तालुक्याचा सिंचनाचा पाय अधिक खोलातच गेला आहे.
विस्तारलेल्या तालुक्यातून कोदवली, अर्जूना, मुचकुंदी आणि खारेपाटणमार्गे वाहत येणारी सुख नदी अशा प्रमुख नद्या वाहतात. दरवर्षी पावसाळ्यामध्ये या नद्यांना दुथडी भरून वाहतात, मात्र उन्हाळ्यात कोरड्या पडतात. त्याचा फटका तालुक्याला बसून तीव्र पाणीटंचाई भासते. त्यावर मात करण्यासाठी प्रस्तावित असलेली धरणे उपयुक्त ठरणार आहेत. धरणांच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मात्र सद्यस्थितीत लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या धरणांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.
तालुक्यातील कामे पूर्ण झालेल्या अनेक धरणांच्या कालव्यांची कामे रखडली आहेत. अनेक धरणांमध्ये वर्षानुवर्षे गाळ मोठ्याप्रमाणात साचलेला आहे. साचलेल्या गाळाचा अनेकवर्ष उपसा न झाल्याने या धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा होत नाही. काम पूर्ण झालेल्या धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. मात्र कालव्यांचे काम पूर्ण झाले नसल्याने धरणामध्ये साठलेल्या पाण्याचा शेती वा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करणे शक्य होत नाही. काही धरणांच्या बाजूच्या गावामध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये तीव्र टंचाई जाणवताना दिसते. दुसर्‍या बाजूला अनेक महत्वाकांक्षी धरणांची कामे विविध कारणांमुळे रखडलेली आहे. रखडलेल्या धरणांची कामे पूर्ण होण्यासाठी आणखीन किती वर्ष लागणार हे अद्यापही अनिश्चित आहे.
----------------
चौकट
दृष्टीक्षेपात राजापूर तालुका
*पूर्ण झालेले सिंचन प्रकल्प ः पाचल-दिवाळवाडी प्रकल्प, सौंदळ- बारेवाडी प्रकल्प, पाचल-तळवडे धरण, परूळे धरण, कोंड्ये धरण, जुवाठी प्रकल्प, केळवली प्रकल्प, वाटूळ प्रकल्प
*अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प ः ओझर प्रकल्प, पांगरे बुद्रुक धरण, कळसवली धरण, मूर-वाळवड धरण, ताम्हाणे प्रकल्प, काजिर्डा-जामदा मध्यम प्रकल्प, अर्जूना मध्यम प्रकल्प.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97945 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..