भवानी-वाघजाई मंदिरात नवरात्रौत्सवाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भवानी-वाघजाई मंदिरात नवरात्रौत्सवाचे आयोजन
भवानी-वाघजाई मंदिरात नवरात्रौत्सवाचे आयोजन

भवानी-वाघजाई मंदिरात नवरात्रौत्सवाचे आयोजन

sakal_logo
By

rat२०p३५.jpg
५१४१४
चिपळूण ः टेरव येथील श्री भवानी वाघजाईमातेचे मंदिर.
------------
भवानी-वाघजाई मंदिरात नवरात्रौत्सवाचे आयोजन
२६ पासून कार्यक्रम; भैरी-भवानी, नवदुर्गा असलेले एकमेव देवस्थान
चिपळूण, ता. २१ः तालुक्यातील टेरव येथील भाविक व पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या पर्यटनाचा ‘क’ दर्जा व तिर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा बहाल केलेल्या कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री भवानी वाघजाई मातेचा नवरात्रौत्सव होणार आहे. या निमित्ताने २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान पारंपरिक रूढी-परंपरेप्रमाणे धार्मिक विधी व पूजन करून नवरात्रौत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवात श्री भवानी, वाघजाई, महालक्ष्मी, कुलस्वामिनी या देवींना वारानुसार नवरंगाच्या साड्या परिधान करून सोन्या-चांदीच्या मौल्यवान अलंकारांनी सालंकृत करण्यात येणार आहे. मंदिरास विविध प्रकारच्या आकर्षक फुलांची सजावट करून, पालखीत रूपी लावण्यात येणार आहेत.
या मंदिरात भवानीमातेच्या ७.५ फूट उंचीच्या अत्यंत सुंदर व अप्रतिम कृष्णशिला मूर्तीसह गणपती, वाघजाई, भूमिगत कालकाई, महालक्ष्मी, कुलस्वामिनी, महादेवाची पिंडी, भैरी, केदार तसेच नवदुर्गा आदी देवतांची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराचे खास आकर्षण म्हणजे श्री भवानीमातेबरोबरच शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या नवदुर्गांच्या मूर्ती सविस्तर माहितीसह स्थापित केलेल्या आहेत. भैरी-भवानी आणि नवदुर्गा असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव देवस्थान आहे.
कोकणातील दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले हे मंदिर भाविक व पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. नागमोडी वळणाचा रस्ता, वनश्रीने नटलेले विस्तीर्ण पठार, तसेच गोपुरांचे भव्यदिव्य मंदिर, आकर्षक मूर्ती, डोळ्यांचे पारणे फेडणारे सुंदर उद्यान, देवरहाटीतील हिरवीगार वनराई आणि गारवा यामुळे असंख्य भाविक व पर्यटक या देवस्थानाकडे आकर्षित होत आहेत.
श्री क्षेत्र टेरव येथील भवानी-वाघजाई मातेच्या मंदिराबरोबरच चिपळूण येथील विंध्यवासिनी, परशुराम मंदिर, दसपटीची रामवरदायिनी, तुरंभव येथील शारदादेवी तसेच मार्लेश्वर मंदिर आदी मंदिराचे दर्शन भक्तगण व पर्यटक घेऊ शकतील. टेरवचे मंदिर दर्शनासाठी सदैव खुले राहणार असून, देवींच्या ओटीचे सामान मंदिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन टेरव ग्रामस्थांच्यावतीने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97954 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..