खेड ः संकलन शिक्षकासाठी पुस्तक संग्रह मार्गदर्शक ठरेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः संकलन शिक्षकासाठी पुस्तक संग्रह मार्गदर्शक ठरेल
खेड ः संकलन शिक्षकासाठी पुस्तक संग्रह मार्गदर्शक ठरेल

खेड ः संकलन शिक्षकासाठी पुस्तक संग्रह मार्गदर्शक ठरेल

sakal_logo
By

rat20p32.jpg
51410
मुंबईः धनाजी पाटील यांच्या संकलन शिक्षकासाठी पुस्तकाचे प्रकाशन करताना शिक्षक आमदार कपिल पाटील.
-----------
‘संकलन शिक्षकांसाठी’ मार्गदर्शक ठरेल
शिक्षक आमदार कपिल पाटील ; पुस्तकाचे प्रकाशन
खेड, ता. 20 ः शिक्षणक्षेत्रातील कार्यरत असलेले संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह शिक्षक चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल, असा अत्यंत उपयुक्त संग्रह शिक्षकभारतीचे राज्य उपाध्यक्ष धनाजी पाटील यांनी तयार केला आहे, असे गौरवोद्धार शिक्षक भारतीचे संस्थापक व शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी काढले.
धनाजी पाटील यांनी दीर्घकाळ सेवा बजावून शिक्षक क्षेत्राशी निगडित कायदे, शासननिर्णय व निवडक न्यायालयाने निकाल आदी संग्रहित केलेल्या संकलन शिक्षकासाठी पुस्तकाचे प्रकाशन शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील शिक्षक भारतीच्या कार्यालयात झाले. कपिल पाटील म्हणाले, संग्रह पुस्तकाचे स्वरूप पाहता ते शिक्षकांना एक जवळचा मार्गदर्शकाची भूमिका बजावेल. धनाजी पाटील यांनी कार्य व त्यांनी पुस्तकातून केलेली विषयवार मांडणी याचा मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या वेळी शिक्षक भारतीच्या राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता पाटील, शिक्षक भारतीच्या ज्युनिअर महाविद्यालय विभागाचे राज्य अध्यक्ष आर. बी. पाटील, राज्य उपाध्यक्ष हिराजी पाटील, मुंबई विभागाच्या अध्यक्ष कल्पना शेंडे, तलासरी येथील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजपूत, मुख्याध्यापक प्रकाश पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97958 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..