साडवलीतील आयटीआयचा दीक्षांत समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवलीतील आयटीआयचा दीक्षांत समारंभ
साडवलीतील आयटीआयचा दीक्षांत समारंभ

साडवलीतील आयटीआयचा दीक्षांत समारंभ

sakal_logo
By

साडवलीतील आयटीआयचा दीक्षांत समारंभ
साडवली ः देवरूख मातृमंदिरने १९८७ ला सुरू केलेल्या इंदिराबाई बेहरे आयटीआय विभागात दुर्गम भागातील शेतकरी, कष्टकरी घरातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्याचे काम सातत्याने होत आहे. यावर्षी झालेल्या परीक्षेमध्ये मातृमंदिर आयटीआयने 97 टक्के निकालासह उत्तम यश संपादन केले. मोटार मेकॅनिक, फिटर, टर्नर, वायरमन व वेल्डर अशा 5 ट्रेडमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ मातृमंदिर आयटीआय येथे घेण्यात आला. या वेळी प्राचार्य समीर हेगशेट्ये, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आदी उपस्थित होते.
---------
rat20p7.jpg
51353
साडवली ः राज शिंदे याचा सत्कार करताना नगराध्यक्षा मृणाल शेट्ये.
------------
राज शिंदे याची बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
साडवली ः देवरूखच्या राज शिंदे याची मुंबई येथे होणाऱ्या विद्यापीठाच्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल देवरूख नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्या हस्ते राज याचा सत्कार करण्यात आला. या विभागीय स्पर्धेमध्ये 23 कॉलेजमधून 230 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामधील फक्त 7 खेळाडूंना कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यामध्ये संगमेश्वर तालुक्यामधील राज हा एकमेव खेळाडू आहे. या वेळी राजचे आई-वडील, नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, वैभव कदम, नगरसेवक राजेंद्र गवंडी, नगरसेवक प्रफुल्ल भुवड, राजू वणकुद्रे आदी उपस्थित होते.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97961 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..