माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल 95 टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल 95 टक्के
माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल 95 टक्के

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल 95 टक्के

sakal_logo
By

rat२०p३१.jpg -
५१४०९
सानिका कुलकर्णी, अक्षय शिखरे, सूरज अणेराव, शुभम पानगले
-----------
माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल ९५ टक्के
साडवली, ता. २०ः मुंबई विद्यापिठाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यापिठाशी सलग्न राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयामधून परीक्षा दिलेल्या २२३ विद्यार्थांपैकी २१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ९५ टक्के इतका लागला.
महाविद्यालयातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विद्याशाखेमधून ७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९८.६३ टक्के लागला. त्यामध्ये सानिका कुलकर्णी ९.२५ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम आली आहे. प्रगती इंदुलकर ८.५५ पॉइंट मिळवून दुसरी तर समृद्धी जाधव ८.४६ पॉइंटसह तिसरी आली आहे.
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या विद्याशाखेमधून ५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाखेचा निकाल ९८.०८ टक्के लागला आहे. त्यामध्ये अक्षय शिखरे ९.१५ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम, नूरउल्हासन मुगळे ८.६९ पॉइंट मिळवून दुसरा तर अनिकेत बने ८.६८ पॉइंटसह तिसरा आला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेमधून ७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९०.७९ टक्के इतका लागला आहे. त्यामध्ये सूरज अणेराव ९.२६ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम, महेंद्र गोरुले ८.९० पॉइंट मिळवून दुसरा तर यशदीप चव्हाण ८.८५ पॉइंटसह तिसरा आला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी या शाखेमधून २२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९०.९१ टक्के इतका लागला आहे. त्यामध्ये शुभम पानगले ८.०६ पॉइंटसह महाविद्यालयामध्ये प्रथम, प्रज्वल सावंत ७.७५ पॉइंटसह दुसरा तर ओजस सन्नक ७.७५ पॉइंटसह तिसरा आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97971 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..