दिक्षा, भावेशला मिळणार शिष्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिक्षा, भावेशला मिळणार शिष्यवृत्ती
दिक्षा, भावेशला मिळणार शिष्यवृत्ती

दिक्षा, भावेशला मिळणार शिष्यवृत्ती

sakal_logo
By

rat२०p१३.jpg
५१३६८
भावेश धुमाळे
rat२०p१४.jpg ः
५१३६९
दिक्षा मोंडे
----------
दिक्षा, भावेशला मिळणार शिष्यवृत्ती
राजापूरः तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयातील दिक्षा मोंडे आणि भावेश धुमाळे या विद्यार्थ्यांनी शासकीय एनएमएमएस परीक्षेमध्ये सुयश मिळवले असून त्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामध्ये यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून आगामी चार वर्ष दरवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर, सहाय्यक शिक्षक रामदास सावंत, दीपक सूर्यवंशी, गोंडाळ यांचे मार्गदर्शन मिळाले.
-----------
rat२०p१५.jpg
५१३७०
राजापूरः मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर यांच्याकडे प्रोजेक्टर भेट देताना पराग कारेकर.
--------
जुवाठी विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांकडून देणगी
राजापूर ः तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांनी विविध वस्तू देणगी स्वरूपामध्ये देऊन विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये सेवानिवृत्त अपग्रेड मुख्याध्यापक शशिकांत कारेकर यांचे चिरंजीव पराग कारेकर यांनी प्रोजेक्टर, जुवाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे यांनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गौतम बुद्ध यांचे फोटो तर महाळुंगे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी पंखा देणगी म्हणून दिला. या देणगीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर यांनी त्यांचे आभार मानले.
----------
rat२०p१६.jpg
५१३७१
राजापूर ः अनुपमा कुळकर्णी यांचा सत्कार करताना नॅशनल इंग्लिश स्कूलच्या उपप्राचार्य विजया कोले.
-----------
अनुपमा कुलकर्णीचे सुयश
राजापूर ः शहरातील नॅशनल इंग्लिश स्कूलची माजी विद्यार्थिनी अनुपमा कुलकर्णी हिने नीट परीक्षेमध्ये ५८६ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचा नॅशनल इंग्लिश स्कूलतर्फे उपप्राचार्य विजया कोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनुपमा हिने नीट परीक्षेची पूर्वतयारी रत्नागिरी येथील एडुझोन इन्सिट्यूटमधून केली असून पहिल्या प्रयत्नामध्ये तिने परीक्षेमध्ये यश मिळवले आहे. या यशाचे श्रेय तिने एडुझोनचे संस्थापक समीर झारी, कॉलेज मॅनेजमेंट, आई-वडील यांना दिले आहे. भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले आहे.
--------
विज्ञान नाट्यस्पर्धेत मुकादमचे सुयश
खेड ः रत्नागिरीतील जिल्हास्तर विज्ञान नाट्यस्पर्धेत येथील हाजी एस. एम. मुकादम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सुयश प्राप्त केले. बुशरा चिपळूणकर, आरजू कादिरी, अनम कुरेशी, इकरा नाडकर, मुनज्जा कवलेकर, युसुफ बडीगर, इमरान शेख, म. मुश्ताक बेबल या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला होता. राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवांतर्गत रत्नागिरी येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली होती. मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर आधारित या स्पर्धेत प्रशालेने पाचवा क्रमांक प्राप्त केला. प्रशालेला जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. रमा भोसले, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
-----------
एमएचटी-सीईटीमध्ये सुयश, बीबीफातिमा प्रथम
खेड ः भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित (कै.) श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिरच्या उच्च माध्यमिक विभागातील एमएचटी-सीईटी पीसीएम ग्रुपमध्ये सुयश पाटील याने ९९.७७ पर्सेनटाईल तर बीबीफातिमा पटेल हिने ९८.४९ पर्सेनटाईल मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. परीक्षेत एकूण १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक पर्सेनटाईल मिळाले. एमएचटी-सीईटी पीसीएम ग्रुपसाठी प्रशालेतून प्रविष्ठ १०९ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेनटाईल मिळवून उत्तीर्ण झाले. यामध्ये अनुक्रमे यशश्री माने (९९.०४) द्वितीय, अथर्व यादव (९८.६४) तृतीय, प्रणयं दळवी (९८.५६) चौथा, साहिल घाटगे (९८.२३) पाचवा, तेजस पोकळे (९८.२२) सहावा ठरला. एमएचटी-सीईटी पीसीबी ग्रुपसाठी प्रविष्ठ ८७ विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेनटाईल मिळाले. यामध्ये सानिका धर्मे (९८.३७) द्वितीय, जुवेरिया चौगले (९८.२२) तृतीय, स्वरा म्हापुसकर (९७.९३) चौथी, ऐश्वर्य जाधव (९७.८५) पाचवा ठरला.
---

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98040 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..