हुमरमळ्याचे पाच जण मारहाणप्रकरणी निर्दोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुमरमळ्याचे पाच जण
मारहाणप्रकरणी निर्दोष
हुमरमळ्याचे पाच जण मारहाणप्रकरणी निर्दोष

हुमरमळ्याचे पाच जण मारहाणप्रकरणी निर्दोष

sakal_logo
By

हुमरमळ्याचे पाच जण
मारहाणप्रकरणी निर्दोष

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २० ः तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या शासकीय वाहनाचे चालक महेश झालबा यांना त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याच्या आरोपातून हुमरमळा येथील साईराज अणावकर, अमेय सावंत, संदेश बागवे, अक्षय सावंत, गजानन पवार यांची सिंधुदुर्गनगरी येथील मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एम. फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्यावतीने अॅड. यतीन खानोलकर, अॅड. कोमल काकतकर यांनी काम पाहिले.
१० जानेवारी २०२० ला फिर्यादी चालक झालबा यांच्या हुमरमळा येथील घरी ही घटना घडली होती. संशयितांनी पावणे बाराच्या सुमारास झालबा यांना त्यांच्या घरातून बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली होती. तशी तक्रार झालबा यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात ११ जानेवारीला दिली होती. चालक झालबा यांनी संशयितांच्या वाळूच्या गाड्या पकडून दिल्याच्या रागातून ही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद होते. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण झाली, तेव्हा फिर्यादी झालबा हे शासकीय कर्तव्यावर नव्हते, हे सिद्ध झाल्याने दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी यातील ३५३ व ३३२ हे गुन्हे वगळण्यात आले होते. उर्वरित कलामांअन्वये संशयितांविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला चालला; मात्र सबळ पुरावा मिळाला नसल्याने व संशयितांच्या वकिलांनी बचावासाठी मांडलेली बाजू ग्राह्य धरून न्यायालयाने या पाचही जणांनी या आरोपातून निर्दोष मुक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98046 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..