लांजा बसस्थानकाचे काम चार वर्षे अर्धवटच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा बसस्थानकाचे काम चार वर्षे अर्धवटच
लांजा बसस्थानकाचे काम चार वर्षे अर्धवटच

लांजा बसस्थानकाचे काम चार वर्षे अर्धवटच

sakal_logo
By

rat20p46.jpg
51667
लांजाः लांजा बसस्थानकाचे काम रखडलेले असल्याने झाडाझुडुपे वाढली आहेत.
------------------
लांजा बसस्थानकाचे काम अर्धवटच
झाडाझुडपांनी जागा वेढली; लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने प्रवाशांचे हाल
लांजा, ता. २०ः मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा बसस्थानक हायटेक बनवण्यासाठी २०१९ मध्ये त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी काम सुरू झाले. मात्र चार वर्षानंतरही काम अपूर्णच आहे. या आगाराच्या ठिकाणी फक्त पाया टाकून अर्धवट पिलर उभे केले आहेत. त्या शिगांवर आता वेलींनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे. त्यामुळे तो भाग हिरवागार झाला आहे; मात्र, याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
लांजा बसस्थानकाचे आधुनिकीकरण करून अद्ययावत व प्रवाशांच्यादृष्टीने सुसज्ज असे बसस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लांजा तालुक्यातील स्थानिक तसेच मुंबईकर जनतेतून केली जात होती. कारण, सद्यःस्थितीत असलेली लांजा बसस्थानकाची इमारत नादुरुस्त आणि मोडकळीस आली आहे. प्रवाशांसाठी ती पुरेशी नाही. त्यानंतर स्थानिक आमदार राजन साळवी, पालकमंत्री तसेच तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या सहकार्याने या बसस्थानकाच्या इमारतीसाठी १ कोटी ७५ लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला होता. यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर कामाला सुरवात झाली होती; मात्र गेली तीन वर्षे उलटून गेली तरीसुद्धा काम होऊ शकलेले नाही. ज्या ठेकेदाराने काम घेतले त्यांनी तळाच्या भागाचे बांधकाम करून अर्धवट पिलर उभे केले आहेत; मात्र, या पिलरवरील शिगांना सध्या गंज पकडली आहे. तीन वर्षे पावसात भिजून सर्वच बांधकाम निकामी झाले आहे. आता या बांधकाम केलेल्या जागेच्या ठिकाणी सर्व शिगांवरती वेलींचे साम्राज्य पसरले आहे. सर्वत्र बारीक झुडपेंच उगवली असून, हा परिसर बकाल वाटत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98054 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..