महिला सक्षमीकरणाबाबत उद्या जनजागृती फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला सक्षमीकरणाबाबत उद्या जनजागृती फेरी
महिला सक्षमीकरणाबाबत उद्या जनजागृती फेरी

महिला सक्षमीकरणाबाबत उद्या जनजागृती फेरी

sakal_logo
By

महिला सक्षमीकरणाबाबत उद्या जनजागृती फेरी
रत्नागिरी ः भारत सरकारने राजा राममोहन रॉय यांच्या २५०व्या जयंतीनिमित्त देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून महिला सक्षमीकरणावर शालेय मुलांची जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. ही फेरी देशातील २५० जिल्ह्यांत किमान २५० शाळकरी मुले, (प्रामुख्याने मुली) शिक्षक आणि स्थानिक नागरिक यांच्या सहभागाने आयोजित केली जाणार आहे. त्या अनुषंगाने शासकीय विभागीय ग्रंथालयातर्फे गुरुवारी (ता. २२) सकाळी ९ वा. फेरी आयोजित केली आहे. फेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ते जयस्तंभ जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरी काढण्यात येणार आहे. यात सुमारे ३०० विद्यार्थी, शिक्षक सहभागी होतील. यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रंथपाल डॉ. विजयकुमार जगताप यांनी केले आहे.
------
विनाअनुदानित शाळांसाठी अर्ज करा
रत्नागिरी ः स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर नवीन शाळा स्थापन करणे, विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शाळा मान्यतेसाठी अर्ज करण्याकरिता ऑनलाइन संगणकीय प्रणाली (पोर्टल) तयार करण्यात आले आहे. सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या प्रकारच्या स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर नवीन शाळा स्थापन करणे, दर्जावाढ करण्यासाठी शासनाकडून इरादापत्र मिळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने https://mahasfs.org या संकेतस्थळावर नियमित अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे संपर्क साधावा.
--------------
तृतीयपंथीय समस्या निवारणासाठी समिती
रत्नागिरी ः जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे/समस्यांचे जिल्हास्तरावर निवारण होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तृतीयपंथीय समस्या/तक्रार निवारण समिती स्थापना करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र / प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी तृतीयपंथीय व्यक्तींनी www.transgender.dosje.gov.in या पोर्टलवर तत्काळ ऑनलाइन नोंदणी करावी. तृतीयपंथी नागरिकांनी आपल्या काही तक्रारी असल्यास सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण रत्नागिरी, सामाजिक न्यायभवन, कुवारबाव या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98073 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..