दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गटात राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गटात राडा
दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गटात राडा

दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गटात राडा

sakal_logo
By

दोन महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांच्या गटात राडा
चिपळुणातील घटना ; पोलिस आल्याने काढला पळ
चिपळूण, ता. २०ः शहरातील दोन महाविद्यालयांतील तरुणांच्या गटात राडा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर शिवसेना शहरप्रमुखांच्या संपर्क कार्यालयासमोर हा प्रकार घडला. राडा सुरू असतानाच पोलिसांचे आगमन झाले आणि सर्वांनी धूम ठोकली. दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात दोन गटात मारामारी झाली होती.
मुंबई-गोवा महामार्गावर ओझरवाडी येथे दोन गटांत क्षुल्लक कारणातून हा राडा झाला. सुरवातीला महाविद्यालय परिसरात हा प्रकार घडला. त्यानंतर हे दोन गट थेट महामार्गावर भिडले. त्या ठिकाणी दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ करत दगडफेक सुरू केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस रवाना झाले. पोलिस येत असल्याचे पाहून सर्वांनी धूम ठोकण्यात धन्यता मानली.
विशेष म्हणजे याच परिसरात दोन महिन्यांपूर्वी दोन गटात मारामारी झाली होती. पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याने त्यांनी सर्व तरुणांना पोलिस ठाण्यात आणले होते. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून घेतले होते. शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना समज देत सोडून देण्यात आले होते. या परिसरात क्षुल्लक कारणातून मारामारीचे प्रकार वारंवार घडत असल्याची चर्चा आहे. यापूर्वी असे प्रकार क्वचितच होत असत. सद्यःस्थितीत असे प्रकार वाढले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98084 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..