भुरळ घालून वृद्धाला २ लाखाला लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुरळ घालून वृद्धाला २ लाखाला लुटले
भुरळ घालून वृद्धाला २ लाखाला लुटले

भुरळ घालून वृद्धाला २ लाखाला लुटले

sakal_logo
By

भुरळ घालून वृद्धाला २ लाखाला लुटले
दोघांवर गुन्हा दाखल ः सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
रत्नागिरी, ता. २० ः शहरातील रामनाका ते आठवडाबाजार दरम्यान वृद्धाला दोन तरुणांनी भुरळ पाडून वृद्धाला लुटल्याचा प्रकार घडला असून, संशयित तरुणांनी २ लाखाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. शहर पोलिसात अनोळखी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. १९) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. याबाबत नंदकिशोर यशवंत पाडळकर (वय ६२, श्रीनगर-खेडशी) यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर पाडळकर हे सोमवारी रामनाका येथे खरेदीसाठी गेले होते. या वेळी अनोळखी तरुण अंदाजे २५ ते ३० वयोगटातील त्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून भुरळ पाडली. त्यांना आठवडा बाजारपर्यंत नेले. तेथे पाडळकर यांच्या अंगावरील सोन्याची चेन, अंगठी असे काढून घेऊन १ लाख ९२ हजाराला लुटले आणि फरार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाडळकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्य़ात तक्रार दिली. अज्ञात तरुणाचे वर्णन केले. यातील एक संशयित २५ ते ३० वयातील असून, रंग सावळा, चेहरा उभट, बांधा, सडपातळ, हिंदी भाषेत बोलणे, अंगात फुल हाताचा राखाडी टीशर्ट, जीन्स, पायात स्लिपर असे एकाचे वर्णन आहे तर दुसरा सुमारे ४० ते ४५ वर्षाचा असून, रंग सावळा, चेहरा गोल, बांध मजबूत, अंगात हाफ हाताचा डार्क ब्लू रंगाचा लाईन असलेला शर्ट व निळ्या रंगाची जीन्स, पायात स्लिपर असा आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा केला असून, सीसीटीव्ही आठवडा बाजार परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत आहेत. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
------
मांडवी किनारी अनोळखी तरुणाचा मृतदेह
रत्नागिरीः शहरातील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला आहे. शहर पोलिसात मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना मंगळवारी (ता. २०) सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली. समुद्रकिनारी मॉर्निंग वॉकला गेलेल्या लोकांना हा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाही. मृतदेहाबाबत कोणाला काही माहिती असल्यास शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------
मधमाशा चावल्याने तरुणाचा मृत्यू
राजापूरः तालुक्यातील शिवणे बु. गुरववाडी येथील यशवंत कृष्णा गुरव (४०, शिवणे बु. गुरववाडी, राजापूर) या तरुणाचा शेतामध्ये काम करताना मधमाश्या चावल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची खबर दिलीप कृष्णा गुरव (शिवणे बु. राजापूर) यांनी पोलिसात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंत गुरव हे शेतामध्ये कामाला गेले होते. तेथे त्यांना मधमाशा चावल्या. यानंतर त्यांना राजापुरातील खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार करून घरी सोडण्यात आले; मात्र, त्याच दिवशी (ता. १६) शुक्रवारी त्यांची तब्येत आणखी बिघडली. त्यामुळे त्यांना राजापुरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. तेथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98095 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..