रत्नागिरी ः रामदास कदमांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः रामदास कदमांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध
रत्नागिरी ः रामदास कदमांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध

रत्नागिरी ः रामदास कदमांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध

sakal_logo
By

51533
फोटो ओळी
- rat20p38.jpg- रत्नागिरी ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करत शिवसैनिकांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
------

रामदास कदमांचा शिवसैनिकांकडून निषेध

प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन; जोरदार घोषणाबाजी

रत्नागिरी, ता. २० ः माजी पर्यावरणमंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जाहीर सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली. मंगळवारी (ता. २०) शिवसेनेच्या संपर्क कार्यालयासमोर रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे सेनेकडून दहन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करत रामदास कदम यांचा तीव्र निषेध केला.
शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी दौऱ्यात रामदास कदम यांच्यासह आमदार योगेश कदम यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाचा जाहीर मेळावा दापोलीत झाला. या मेळाव्यामध्ये रामदास कदम यांनीदेखील उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. उद्धव ठाकरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची भांडी घासत असल्याचे विधान केले. यामुळे शिवसेनेत प्रचंड संताप पसरला आहे. त्याचे जोरदार पडसाद मंगळवारी उमटले.
शहरातील आठवडा बाजारातील शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिक गोळा झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख संजू साळवी, प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवा पदाधिकारी प्रसाद सावंत आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करत निषेध व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98110 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..