मंत्री चव्हाणांकडून विकासकामांची गंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री चव्हाणांकडून 
विकासकामांची गंगा
मंत्री चव्हाणांकडून विकासकामांची गंगा

मंत्री चव्हाणांकडून विकासकामांची गंगा

sakal_logo
By

51529
घारपी ः येथील श्री स्वामी समर्थ मठात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घालताना मांद्रे गोव्याचे आमदार जीत आरोलकर. शेजारी सरपंच अक्रम खान, निलेश कदम, निलेश देसाई आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

मंत्री चव्हाणांकडून
विकासकामांची गंगा
आरोलकर ः घारपीत दीर्घायुष्यासाठी साकडे

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २० ः सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे खऱ्या अर्थाने राज्याचे विकासपुरुष आहेत. त्यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात विकासाची गंगा निर्माण केली आहे. त्यांच्या विकासकामांचा धडाका यापुढेही कायम राहून महाराष्ट्र राज्य हे विकासाच्या प्रगतीवर राहू दे, असे साकडे मांद्रेचे (गोवा) आमदार तथा गोवा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर यांनी घारपी मठ येथील श्री स्वामी चरणी घातले. यावेळी मंत्री चव्हाण यांच्या आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.
आमदार जीत यांनी आज सायंकाळी बांदा सरपंच अक्रम खान, युवा सामाजिक कार्यकर्ते नीलेश कदम, नीलेश देसाई यांच्यासह घारपी येथील जागृत श्री स्वामी समर्थ मठाला भेट देऊन श्री स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त साकडे घातले. यावेळी घारपी मठाचे प्रमुख विजय गावकर उपस्थित होते. आमदार आरोलकर म्हणाले की, ‘‘मंत्री रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र राज्यात काम करण्याची कार्यशैली ही विकासात्मक आहे. राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळतानाच सर्वसामान्यांच्या प्रश्नांनाही न्याय देण्याचे काम ते तत्परतेने करतात. त्यांच्या विकासकामांचा धडाका पाहता ते राज्याचे खऱ्या अर्थाने विकासपुरुष आहेत. त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो यासाठीच श्री स्वामी चरणी प्रार्थना करण्यासाठी याठिकाणी आलो.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y98136 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..